
Oil Update : भारत पामतेलाचा सर्वात मोठा ग्राहक आहे. पण मागील काही महिन्यांपासून सोयातेल आणि सूर्यफुल तेलाचे दर कमी झाल्याने पामतेलाची आयात कमी झाली.
मे महिन्यातील पामतेल आयात मागील २७ महिन्यांतील निचांकी असेल, असे खाद्यतेल डिलर्स आणि आयातदारांनी सांगितले.
जगात मलेशिया आणि इंडोनेशिया पामतेल उत्पादनात महत्वाचे देश आहेत. तर भारत खाद्यतेलाचा आणि पामतेलाचा सर्वात मोठा आयातदार आहे. भारत गरजेच्या जवळपास ६५ ते ७० टक्के खाद्यतेल आयात करतो. यात पामतेलाचा वाटा जास्त असतो.
पण मागील काही महिन्यांमध्ये सोयातेल आणि सूर्यफुल तेलाचे दर कमी झाले. यामुळे भारताने पामतेलाची आयात कमी केली. याचा दबाव पामतेलावर येत आहे.
आता पामतेल आणि सोयातेल तसेच सूर्यफुल तेलाच्या दरातील तफावत कमी झाली. त्यामुळे भारतीय आयातदारांनी पामतेलाचे कार्गोज रद्द करून सोयातेल आणि सूर्यफुल तेलाची आयात करत आहेत. त्यामुळे मे महिन्यातील पामतेल आयात घटली. मे महिन्यातील पामतेल आयात गेल्या २७ महिन्यांतील निचांकी पातळीवर पोचेल, वृत्त राॅयटर्स या संस्थेने दिले.
भारतासारख्या सर्वात मोठ्या तेल आयातदार देशाने खरेदी केल्यामुळे पामतेलाचे दर कमी झाले. बुर्सा मलेशिया एक्सचेंजवर पामतेलाचे वायदे जवळपास २ टक्क्यांनी कमी होऊन ३ हजार ३६५ रिंगीट प्रतिटनांवर पोचले.
रिंगीट हे मलेशियाचे चलन आहे. मे महिन्यातील पहिल्या २० दिवसांमध्ये देशातील विविध बंदरांवर २ लाख ६१ हजार टन पामतेल आयात झाले. उर्वरित ११ दिवसांमध्ये आणखी दीड लाख टन पामतेल आयात होण्याची शक्यता आहे. म्हणजेच मे महिन्यात एकूण ४ लाख ११ हजार टन पामतेलाची आयात होईल, असे आयातदारांनी सांगितले.
भारताचे तेल विपणन वर्ष नोव्हेंबरमध्ये सुरु होते. यंदा पहिल्या सहा महिन्यांमध्ये पामतेलाची आयात दर महिन्याला ८ लाख १८ हजार टनांवर झाली, असे साॅल्व्हेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने म्हटले आहे. सूर्यफुल आणि सोयाबीन तेलाचेही दर कमी झाले. त्यामुळे देशातील काही भागांमध्ये पामतेलाऐवजी सूर्यफुल तेल आणि सोयातेलाचा वापर वाढत आहे. यामुळे पामतेलाची आयात कमी होत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.