Cotton Market : कापूस विक्रीचं नियोजन यंदाही चुकलं का?

कापसाचा कमाल भाव आता ८ हजार २०० रुपयांपेक्षा कमी मिळतोय. तर किमान भाव ७ हजार ५०० रुपयांवर आला.
Cotton Market Rate News
Cotton Market Rate NewsAgrowon

Cotton Rate : देशातील बाजारात सध्या कापसाचे भाव हंगामातील निचांकी पातळीवर पोचले. यंदा शेतकऱ्यांनी चांगल्या दराच्या अपेक्षेने कापूस मागं ठेवला. एरवी डिसेंबर आणि जानेवारी या जास्त विक्रीच्या महिन्यात यंदा कापूस आवक (Cotton Arrival) मर्यादीत राहिली.

पण भाव दबावातच आले. मार्च महिन्यात शेतकरी पॅनिक सेलिंग करत असल्याचा फटका बसत असल्याचे जाणकारांनी सांगितले.

देशातील बाजारात मागील एक महिन्यापासून कापासचे दर कमी झाले आहेत. सध्या बाजारात कापसाची आवक वाढल्याने दरात नरमाई आली.

कापसाचा कमाल भाव आता ८ हजार २०० रुपयांपेक्षा कमी मिळतोय. तर किमान भाव ७ हजार ५०० रुपयांवर आला. बाजारातील आवकही मागीलकाही वर्षाच्या तुलनेत वाढलेली आहे. त्याचा दबाव कापसावर आला.

Cotton Market Rate News
Cotton, Soybean Market : कापूस, सोयाबीनबद्दल ॲग्रोवनचे अंदाज चुकले का?

मागील वर्षापर्यंतचा विचार केला तर शेतकरी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात कापसाची सर्वाधिक विक्री करत. जानेवारीपर्यंत शेतकरी ७० ते ८० टक्के कापूस विकत. पण यंदा जानेवारीपर्यंत ३० ते ४० टक्यांपर्यंतच कापूस विकला.

तर फेब्रुवारीपर्यंत केवळ ५० टक्केच कापूस बाजारात आला होता. शेतकरी यंदा कापसाची मर्यादीत विक्री करतील असं वाटतं होतं. कापसाचे भावही सरासरी ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते.

पण फेब्रुवारीच्या मध्यापासून बाजारातील कापसाची आवक वाढली. दैनंदीन आवक गेल्यावर्षीच्या तुलनेत ३० ते ५० टक्क्यांनी वाढली. मार्च महिन्यात तर आवक गेल्यावर्षीच्या तुलनेत जवळपास दुपटीवर पोचली.

उद्योगांना अपेक्षित पॅनिक सेलिंग सुरु झाल्याने कापूस दरावर आणखी दबाव आला. त्यामुळे कापसाचे भाव सरासरी ८ हजार रुपयांपेक्षा कमी झाले.

शेतकऱ्यांनी यंदा ऐन आवकेच्या हंगामात कापूस रोखला. पण कमी आवकेच्या काळात कापूस विक्री वाढवली. मार्च महिन्यात तर पॅनिक सेलिंग सुरु झाले. त्यामुळे दोन महिने कापूस ठेऊन शेतकऱ्यांच्या पदरात विशेष काही पडले नाही.

Cotton Market Rate News
Cotton Arrival : तूर, हरभरा, कापसाची वाढती आवक

उलट ऑक्टोबर ते जानेवारीच्या काळात असलेला दरही मार्च महिन्यात मिळताना दिसत नाही. नोव्हेंबरच्या तुलनेत तर सध्या क्विंटलमागं एक हजार रुपयांपर्यंत कमी दर मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय.

सध्या कापसाला प्रतिक्विंटलला सरासरी ७ हजार ७०० ते ८ हजार २०० रुपये दर मिळतोय. मार्च महिन्यात आणि एप्रिलमधील काही दिवस आवकेचा दबाव जास्त राहण्याचा अंदाज आहे.

त्यामुळे कापूस दरात चढ उतार राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com