Chana Rate : चांगल्या दर्जाच्या हरभऱ्याचे दर सुधारण्याची शक्‍यता

देशभरातील हरभरा उत्पादक राज्यातील बाजार समित्यांसोबतच महाराष्ट्रातील बाजारात देखील आवक आणि दरात सुधारणा अनुभवली जात आहे.
Chana Rate
Chana RateAgrowon

नागपूर ः मॉन्सून सक्रिय (Monsoon) होण्यासोबतच हरभरा डाळ (Chana Dal) तसेच बेसनाच्या मागणीत (Demand Of Besan) टप्प्याटप्प्याने वाढ होत बाजारावर देखील पुरवठ्यासाठी दबाव वाढता आहे. त्यातच देशांतर्गत बाजारात हरभऱ्याचा पुरवठा (Chana Supply) मर्यादित असल्याने बाजारात हरभरा दरात सुधारणा (Improvement In Chana Rate) अनुभवली जात असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले.

Chana Rate
साखर अायात शुल्क १००, तर चना ४० टक्के

देशभरातील हरभरा उत्पादक राज्यातील बाजार समित्यांसोबतच महाराष्ट्रातील बाजारात देखील आवक आणि दरात सुधारणा अनुभवली जात आहे. कल्याण बाजार समितीत तीन क्‍विंटल आवक आणि ५००० ते ७००० रुपये असा दर होता. शहादामध्ये ३५ क्‍विंटल आवक तर दर ३५०१ ते ७३६२ रुपये मिळाला. जळगावमध्ये बोल्ड हरभऱ्याची १७३ क्‍विंटल आवक होत ८०४९ ते ८०९७ असा दर राहिला. अकोला, अमरावती बाजारांत स्थानिक हरभरा वाणाची ४१९ व तीन क्‍विंटल अशी अनुक्रमे आवक झाली. ४२५० ते ४४५० असा दर या ठिकाणी होता. प्रक्रिया उद्योगाची संख्या, शेतीमालाचा दर्जा या बाबीदेखील दरावर प्रभाव टाकत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळेच वेगवेगळ्या हरभरा वाणांसाठी वेगळा दर दिला जात आहे. तरीसुद्धा बाजारात सुधारणा असल्याचे सांगितले जाते.

Chana Rate
Chana Procurement : सत्तेच्या गोंधळात हरभरा खरेदीचा प्रश्‍न रखडला

स्थानिक वाणाचे दर ४००० ते ४५०० रुपयांवर स्थिर आहेत. जाड हरभरा वाणांना चांगला दर मिळत आहे. चांगल्या दर्जाच्या हरभऱ्याची उपलब्धता कमी होत असल्याने अर्थशास्त्रीय मागणी आणि पुरवठा हे सूत्र प्रभावित झाले आहे. त्यामुळे देखील दरात तेजी आल्याचे सांगण्यात आले.

‘नाफेड’कडून यंदाच्या हंगामात चांगल्या प्रतीच्या २६ लाख क्‍विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली आहे. खरेदी केलेल्या या हरभऱ्याच्या विक्रीचा निर्णयदेखील ‘नाफेड’कडून घेण्यात आला आहे. परंतु मर्यादित स्वरूपात ही विक्री होणार असल्याने ही घडामोड हरभरा बाजारावर दराच्या बाबतीत अपेक्षित दबाव पाडण्यात असमर्थ ठरल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. या सर्व कारणांमुळे येत्या काळात हरभरा दर हमीभावाजवळ पोहोचतील. उच्च प्रतीच्या हरभऱ्याची त्यानंतरही उपलब्धता न झाल्यास हरभरा बाजारात सुधारणा अनुभवली जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळेच ‘नाफेड’च्या खरेदी-विक्री धोरणाकडे सगळ्यांच्या नजरा खिळून आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com