भारतीय बंदरांवर जवळपास २१ लाख टन गहू अडकून

बाजारातील आवक कमी झाल्यानं दरात झाली सुधारणा
भारतीय बंदरांवर जवळपास  २१ लाख टन गहू अडकून
wheatagrowon

पुणे ः देशातील घटलेलं उत्पादन आणि खरेदीला मिळालेला कमी प्रतिसाद यामुळं सरकारनं तत्काळ निर्यातबंदी केली. पणं बाजारात दर नरमल्यानं शेतकऱ्यांनी(farmer) माल रोखून धरला. अनेक महत्वाच्या बाजारांत आवक निम्म्यावर आली. त्यामुळं निर्यातबंदीनंतर आठच दिवसांत दर काही प्रमाणात सुधारले. १३ मे रोजी गव्हाचा सरासरी भाव २२०० ते २६०० रुपये होता. तो २० मे रोजी २१०० ते २५०० रुपयांपर्यंत पोचला, असं जाणकारांनी सांगितलं.

गहू निर्यातीची घोडदौड सुरु होती. कधी नव्हे तो गव्हाला बाजारात २२०० ते २५५० रुपयांपर्यंत सरासरी दर मिळत होता. हा दर हमीभाव २०१५ रुपयांपेक्षा खुपच अधिक होता. त्यामुळं सोयाबीन, कापूस आणि मोहरी प्रमाणं गहू(wheat) उत्पादकांना चांगले दिवस आले असं वाटत होतं. पणं केंद्र सरकारनं १३ मे रोजी रात्री अचानक नोटीफिकेशन काढून तत्काळी निर्यातबंदी केली. खुल्या बाजारात हमीभावापेक्षा अधिक दर मिळत असल्यानं सरकारी खरेदीकडं शेतकऱ्यांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे खरेदीचं उद्दीष्ट ४४४ लाख टनांवरून १९५ लाख टनांवर आणलं. पण तेही पूर्ण होईल की नाही, याबाबत शंका होती. त्यातच गव्हाचं उत्पादन १११३ लाख टनांवरून १०६४ लाख टनांपर्यंत घसरलं, असा अंदाज व्यक्त झाला. अन् सरकरानं तत्काळ निर्यातबंदी केली. त्यामुळं जवळपास २१ लाख टन गहू बंदरांवर अकडला. तर गोदामांमध्ये निर्यातीच्या प्रतिक्षेत असलेल्या मालाची आकडेवारी अद्याप पुढे आली नाही.

सरकारनं गहू निर्यातबंदी केली त्यामागं एक महत्वाचं कारण सांगितलं. ते म्हणजे सरकारच्या खरेदीला मिळत असलेला कमी प्रतिसाद. निर्यातबंदीनंतर खुल्या बाजारातील दर पडतील आणि सरकारला खरेदीची संधी मिळेल, असं वाटत होतं. पण निर्यातबंदी (Export ban)करूनही गव्हाचे भाव हमीभावापेक्षा अधिकच आहेत. तसंच शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस आणि मोहरीप्रमाणं गव्हाचं पीकही रोखून धोरलं. त्यामुळं अनेक महत्वाच्या बाजारांतील गव्हाची आवक निम्म्यानं कमी झाली. त्यामुळं निर्यातबंदीनंतर तिसऱ्याच दिवशी दर स्थिरावले. तर आता काही बाजारांत दरांमध्ये काहीशी सुधारणा पाहायला मिळाली.

देशातील महत्वाच्या बाजारांतील गहू दराचा विचार करता, दिल्ली येथे कमाल दर १३ मे रोजी २३५० रुपये होता. तो २० मे रोजी म्हणजेच शुक्रवारी २२२५ रुपयांवर पोचला. गुजरातमध्ये सर्वसाधारण दर २६०० रुपये होता. तो २४०० रुपयांवर आला. मध्यप्रेदशातील सर्वसाधारण दर २५०० रुपये होता, तो शुक्रवारी २४५० रुपयांवर स्थिरावला. उत्तर प्रदेशात भाव २१५० रुपयांवरून २१०० रुपयांवर आला. तसेच राजस्थानमधील बाजारांतील गव्हाचे दर २३०० रुपये होते, ते २१५० रुपयांपर्यंत आले. म्हणजेच सर्वंच महत्वाच्या राज्यांत गव्हाच्या दरातील घसरण थांबली असून दर काहीसे सुधारले. शेतकऱ्यांनी बाजारातील आवक रोखल्यास दर मजबूत स्थितीत राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. दुसरीकडं काही भागांत शेतकरी सरकारच्या खरेदीकेंद्रांवर गहू विकत आहेत. त्यामुळं खुल्या बाजारात कमी माल येईल. परिणामी दरात सुधारण्याला अनुकूल परिस्थिती होईल, असंही जाणकारा सांगतात.

दरम्यान, भारतानं गहू निर्यातबंदी केल्यानंतर अनेक देशांनी टीका केलीये. तर युरोपियन युनियननं कोणत्याही शेतीमालाच्या निर्यातीवर बंदी न घालण्याचा निर्णय घेतलाय. भारतानं गहू निर्यातबंदी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या दरवाढीमुळेही अनेक देशांनी चिंता व्यक्त केली होती. दुसरीकडं निर्यातीतून भारताला अतिरिक्त साठा कमी करण्याची संधी मिळाली. पणं देशातील उत्पादन आणि सरकारी खरेदीला मिळणाऱ्या प्रतिसादाचं गणित चुकल्यानं सरकारला हा निर्णय घ्यावा लागला. उद्दीष्टाएवढी गहू खरेदी झाल्यास सरकार कदाचित पुन्हा निर्यातीला परवानगी देऊ शकते. किंवा बंदारांवर अडकलेल्या २०.६६ हजार टन गहू तरी निर्यात होऊ देईल, असा आशावाद जाणकार व्यक्त करत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com