Chana Market : हमीभावाने ८.५ लाख टन हरभऱ्याची खरेदी; कोणत्या राज्यात झाली सर्वाधिक खरेदी?

देशात सरकारी संस्थांनी आतापर्यंत आठ राज्यांमध्ये गुरुवारपर्यंत ८ लाख ५० हजार टन हरभरा खरेदी केला.
Chana Rate
Chana RateAgrowon

Chana Rate Update : देशात सरकारी संस्थांनी आतापर्यंत आठ राज्यांमध्ये गुरुवारपर्यंत ८ लाख ५० हजार टन हरभरा खरेदी (Chana Procurement) केला.

नाफेडने दिलेल्या माहितीनुसार, देशातील ४ लाख ३४ हजार शेतकऱ्यांकडून हरभरा खरेदी करण्यात आली. ५ हजार ३३५ रुपये हमीभावानुसार या हरभऱ्याचे मुल्य ४ हजार ५३४ कोटी रुपये इतके होते.

गुरुवारपर्यंत महाराष्ट्रात सर्वाधिक ३ लाख ८१ हजार टनांची खेरदी झाली होती. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांडून २ हजार ३३ कोटींचा हरभरा खरेदी केला गेला. महाराष्ट्रानंतर गुजरातमधून ९३३ कोटींच्या १ लाख ७४ हजार टनांची खरेदी झाली.

मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांकडून ७१८ कोटीच्या १ लाख ३४ हजार टन, कर्नाटकमधून ३०४ कोटींच्या ५७ हजार १६१ टन आणि तेलंगणातून २६८ कोटी रुपये किमतीच्या ५० हजार टनांची खरेदी करण्यात आली. तसेच आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांकडून २६३ कोटी रुपयांचा ५० हजार टन हरभरा खरेदी झाला.

Chana Rate
Chana Market : बुलढाण्यात सुमारे ७० टक्के हरभरा विक्री शिल्लक

राजस्थानमध्ये सरकारी संस्थांनी आतापर्यंत १० कोटींचा १ हजार ८६२ टन हरभरा खरेदी केला. तर उत्तर प्रदेशात २ कोटींच्या ३७६ टनांची खरेदी झाली. इतर राज्यांच्या तुलनेत राजस्थान आणि उत्तर प्रदेशात हरभरा खरेदीची गती कमी आहे.

या दोन्ही राज्यांमध्ये हरभरा खरेदी नगण्या पातळीवरच आहे. नाफेडच्या मते देशातील ४ कोटी ३४ लाख शेतकऱ्यांना सरकारी खरेदीचा फायदा झाला.

उत्पादनाचा अंदाज

केंद्र सरकारने यंदा देशात विक्रमी हरभरा उत्पादनाचा अंदाज जाहीर केला. सरकारच्या मते हरभरा उत्पादन १३६ लाख टनांवर पोचेल. गेल्या हंगामात सरकारचा अंदाज १३५ लाख टनांचा होता. तर प्रत्यक्ष उत्पादन १३५ लाख ४४ हजार टनांवर पोचले होते. काही व्यापाऱ्यांच्या मते उत्पादन सरकारच्या अंदाजाप्रमाणं होऊ शकतं. मात्र अनेक व्यापारी सरकारच्या या अंदाजाशी सहमत नाहीत.

दर हमीभावापेक्षा कमी

नाफेडने महत्वाच्या हरभरा उत्पादक महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकात खरेदी सुरु केली. खरेदीची गतीही चांगली आहे. त्यामुळे खुल्या बाजारालाही आधार मिळाला. तर मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये बाजारातील हरभरा आवक वाढली आहे.

त्यामुळे हरभरा बाजारावर दबाव आलेला दिसतो. त्यामुळे हरभरा दर हमीभावापेक्षा कमी आहेत. सध्या हरभऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ५०० ते ४ हजार ८०० रुपये दर मिळतोय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com