उद्दीष्ट पुर्ण झाल्याने हरभरा खरेदी थांबवली

राज्यात हजारो शेतकऱ्यांचा हरभरा पडून
उद्दीष्ट पुर्ण झाल्याने हरभरा खरेदी थांबवली
ChanaAgrowon

अकोला ः या हंगामात उत्पादित झालेल्या हरभऱ्याची खरेदी (Chana Procurement) उद्दिष्ट पूर्ण झाल्याच्या कारणाने सोमवारी (ता. २३) अचानक थांबवण्यात आली. यामुळे हरभरा विक्री (Chana Sale) करायचा राहिलेल्या शेतकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शासनाने हरभऱ्याचे उद्दिष्ट वाढवून तातडीने पुन्हा ही खरेदी सुरू करण्याची मागणी सर्वत्र होत आहे.

या हंगामात राज्यात ‘नाफेड’ व ‘एफसीआय’ या (NAFED) दोन एजन्सींच्या माध्यमातून उत्पादक जिल्ह्यांमध्ये हरभऱ्याची खरेदी (Chana) सुरू करण्यात आली होती. राज्याला सुमारे ७० लाख क्विंटल हरभरा खरेदीचे उद्दिष्ट दिल्या गेले होते. यासाठी २९ मेपर्यंत खरेदीची मुदतही होती. मात्र, ही खरेदी या तारखेपूर्वीच पूर्ण झाल्याने पोर्टलवर सोमवारी (ता. २३) दुपारपासूनच एरर यायला सुरुवात झाली. सायंकाळपर्यंत खरेदी केंद्रावरून शेतकऱ्यांना एसएमएस पाठवून याबाबत निरोपही दिला गेला.

यंदा गेल्या हंगामापेक्षा सुमारे दीडपट अधिक खरेदी झालेली आहे. राज्यात रब्बीत हरभऱ्याची लागवड वाढली होती. शिवाय उत्पादनही चांगले आहे. त्यातच खुल्या बाजारात हरभऱ्याचा दर हमीभावापेक्षा ८०० ते १००० रुपयांपर्यंत कमी असल्याने शेतकऱ्यांचा हमीभाव खरेदी केंद्राकडे विक्रीसाठी ओढा राहिला. त्यातच आगामी हंगाम तोंडावर आला असून, शेतकऱ्यांना बी-बियाणे, रासायनिक खत, मशागतीसाठी पैशांची गरज आहे.

खरेदी सुरू करण्याची मागणी
एकीकडे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने शासनाने खरेदी थांबवली. दुसरीकडे आजही नोंदणी केलेल्या हजारो शेतकऱ्यांकडे हरभरा विक्रीशिवाय पडून आहे. शासनाने ही खरेदी पूर्ववत करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. शासनाकडूनही केंद्राकडे याबाबतचा तातडीने प्रस्ताव देत खरेदीचे उद्दिष्ट वाढवण्याची तसेच तारखेची मर्यादासुद्धा वाढवून देण्याची मागणी केंद्राकडे करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. याला मंजुरी मिळाली तर ही हरभरा खरेदी तातडीने पूर्ववत केल्या जाऊ शकते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com