Chana Market : नाफेडची खरेदी पोचली २० लाख टनांवर

Chana Rate : देशातील बाजारात हरभरा भाव दबावातच आहेत. एकीकडे नाफेडची खेरदी वेगाने सुरु आहे. तर दुसरीकडे उत्पादनात मोठी घट आल्याचे शेतकरी सांगत आहेत.
Chana Market News Updates
Chana Market News UpdatesAgrowon

Chana Bajarbhav : देशातील बाजारात हरभरा भाव दबावातच आहेत. एकीकडे नाफेडची खेरदी वेगाने सुरु आहे. तर दुसरीकडे उत्पादनात मोठी घट आल्याचे शेतकरी सांगत आहेत. पण असं असतानाही शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमीच दर मिळत आहे. यामुळे शेतकरी यंदाही अडचणीत आले आहेत.

यंदा देशातील बाजारात तूर, मूग आणि उडदाचे भाव तेजीत आहेत. यामुळे इतरही डाळींचे भाव तेजीत येऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सरकार यंदा उपलब्ध कडधान्यांची खरेदी करून बाजारावर नियंत्रणाचे प्रयत्न करताना दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सरकारने यंदाही हरभरा खरेदी वाढवली. जास्तीत जास्त शेतकरी नाफेडला हरभरा घालण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Chana Market News Updates
Chana Procurement : हमीभावाने ६५ लाख क्विंटल हरभरा खरेदी

चालू हंगामातील नाफेडची हरभरा खरेदी आता २० लाख २२ हजार टनांवर पोचली आहे. गेल्यावर्षीनंतर नाफेडची ही सर्वाधिक खरेदी असू शकते, असे व्यापारी सांगत आहेत. नाफेडने यंदा ८ राज्यांमध्ये हरभरा खरेदी केला. जवळपास ९ लाख शेतकऱ्यांकडून १० हजार ८०० कोटींचा हरभरा खरेदी झाला आहे.

आतापर्यंत मध्य प्रदेशात सर्वाधिक खेरदी केली. त्यानंतर महाराष्ट्रात ६ लाख ७१ हजार टन खेरदी झाली. मध्य प्रदेशातील हरभरा खरेदीने ७ लाख ७३ हजार टनांचा टप्पा पार केला. गुजरातमध्ये ३ लाख १७ हजार टन तर राजस्थानमध्ये १ लाख १२ हजार टनांची खरेदी झाली.

उत्तर प्रदेशात ९१ हजार टनांची खरेदी झाली. तसेच कर्नाटकात ७९ हजार टन आणि आंध्र प्रदेशात ६४ हजार टन आणि तेलंगणात ५० हजार टनांची खरेदी झाली.

देशात यंदा हरभरा उत्पादनात मोठी घट झाली. त्यातच नाफेडची खरेदीही वेगाने सुरु आहे. त्यामुळे हरभरा दरात वाढ अपेक्षित होती. पण हंगामाच्या सुरुवातीपासूनच हरभरा भाव दबावात आहेत.

हरभऱ्याला सध्या सरासरी प्रतिक्विंटल ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. नाफडेची खेरदी सुरु असेपर्यंत हरभरा भाव स्थिर राहू शकतात, असा अंदाज व्यापारी आणि जाणकार व्यक्त करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com