Pulses Rate: तूर, उडदाचे दर चढे राहणार ?

देशात एकूण कडधान्यांचा (Pulses) पेरा ७ टक्के वाढला असला तरी तूर आणि उडदाचा (urad) पेरा गेल्या वर्षीपेक्षा कमीच आहे. १ जुलै पर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात तूर (Tur) आणि उडीद या पिकांचा पेरा अनुक्रमे १४ व ९ टक्के घटलाय.
Tur And Urad market Rate
Tur And Urad market RateAgrowon

देशात एकूण कडधान्यांचा (Pulses) पेरा ७ टक्के वाढला असला तरी तूर आणि उडदाचा (urad) पेरा गेल्या वर्षीपेक्षा कमीच आहे. १ जुलै पर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात तूर (Tur) आणि उडीद या पिकांचा पेरा अनुक्रमे १४ व ९ टक्के घटलाय. जुलैमध्ये पाऊस (Rain season) चांगला राहण्याचा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे कडधान्यांच्या पेरणीक्षेत्रात काही प्रमाणात वाढ होईल. परंतु सोयाबीन (Soybean), कापूस (Cotton), मका (Corn) इत्यादी पिकांकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढलेला असल्याने कडधान्यातील क्षेत्रवाढ मर्यादीत राहील, असा जाणकारांचा अंदाज आहे. त्यामुळे तूर आणि उडदाच्या किंमतीला आधार मिळू शकतो, असा बाजाराचा दीर्घकालिन अंदाज आहे.

देशातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावल्याने कडधान्यांची लागवड वाढली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने १ जुलै पर्यंतची पेरणीची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार देशात २८.०६ लाख हेक्टर क्षेत्रावर कडधान्य पिकांची लागवड झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत २६.२३ लाख हेक्टरवर पेरा झाला होता. मुगाची लागवड ठळकपणे वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुगाखालील क्षेत्र ३२ टक्क्यांनी वाढलं आहे. तूर, उडीद सोडून इतर दुय्यम कडधान्य पिकांच्या पेरणीत ७२ टक्के वाढ दिसतेय.

सरकारने कडधान्य आयातीचा सपाटा लावल्याने गेल्या हंगामात कडधान्यांचे दर पडले. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. दुसरीकडे सोयाबीन, कापूस पिकांमध्ये शेतकऱ्यांना विक्रमी भाव अनुभवायला मिळाला. त्यामुळे यंदा शेतकरी कडधान्य पिकांची पेरणी कमी करतील, असे मानले जात आहे. परंतु केंद्र सरकारने कडधान्यांच्या किमान आधारभूत किंमतींमध्ये (हमीभाव) केलेली वाढ, नवीन वाण, पावसाची साथ यामुळे कडधान्यांचा पेरा वाढेल, असे डाळ उद्योगातील एका गटाचे म्हणणे आहे.

जून महिन्यात तुरीची पेरणी घटल्याने उत्पादनात घट होईल, असे काही व्यापाऱ्यांनी सांगितले. पुढच्या १५ दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही तर पेरणीवर परिणाम होईल. तुरीचा पेरा २५ टक्के घटण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाऊस व्यवस्थित झाला तरीसुध्दा तुरीच्या लागवडक्षेत्रात ७ ते १० टक्के तुट राहील, असे त्यांचे म्हणणे आहे.

तुरीच्या मागणीत वाढ होत असल्याने काही काळ तरी तुरीचे दर वाढतील, असा बाजारविश्लेषकांचा अंदाज आहे. उडदामध्येही दरवाढीला आधार मिळेल. उडदाची घटती आयात, कमी होत चाललेले साठे, पेरणीमधील संभाव्य घट, सरकारकडे असलेला नगण्य बफर स्टॉक यामुळे उडाचे दर वाढण्याची शक्यता आहे. उडदाखालील क्षेत्र भात, मका आणि कापूस या पिकांकडे वळते होण्याचा बाजाराचा अंदाज आहे. त्यामुळे उडदाचे दर चढे राहतील, असे विश्लेषकांनी सांगितले.

यंदा केंद्र सरकार एक लाख टन मूग, चार लाख टन उडीद आणि दहा लाख टन तुरीचा बफर स्टॉक करणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com