Basmati Export: पंजाबमधील बासमती उत्पादक शेतकरी चिंतेत

बासमतीमधील कीटकनाशकांच्या अवशेषांचे प्रमाण नव्याने निर्धारित करण्याचा एफएसएसएआयचा (FSSAI) प्रस्ताव आहे. या प्रस्तावामुळे राज्यातील बासमती उत्पादन, विक्री आणि निर्यातीवर परिणाम होईल, अशी शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे.
Basmati Export
Basmati ExportAgrowon

भारताकडून अनेक देशांना बासमती (Basmati) तांदळाचा पुरवठा केला जातो. पंजाबमध्येही मोठ्या प्रमाणात बासमतीचे उत्पादन घेतले जाते. पंजाबमधील बासमतीला जगभरातून मागणी असते. मात्र सध्या पंजाबमधील शेतकरी सध्या फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या (FSSAI) निर्णयामुळे चिंताग्रस्त झाले आहेत. एफएसएसएआयने बासमतीमध्ये आढळणाऱ्या कीटकनाशकांच्या अवशेषांसंदर्भात एक निर्णय घेतला. या निर्णयामुळे बासमती उत्पादन आणि निर्यातीला फटका बसणार असल्याची भीती बासमती उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार बासमतीमधील कीटकनाशकांच्या अवशेषांचे प्रमाण नव्याने निर्धारित करण्याचा एफएसएसएआयचा (FSSAI) प्रस्ताव आहे. या प्रस्तावामुळे राज्यातील बासमती उत्पादन, विक्री आणि निर्यातीवर परिणाम होईल, अशी शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे.

Basmati Export
Basmati export : बासमती निर्यात दरात विक्रमी वाढ

बासमती तांदळात आढळणाऱ्या कीटकनाशकांच्या अवशेषांचे प्रमाण हा भारतासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. जगातील अनेक देशांनी याबाबत आक्षेप घेतला असून कीटकनाशक अवशेषांचे प्रमाण कमी असलेल्या बासमतीला प्राधान्य देण्यात येते. त्यामुळेच एफएसएसएआयकडून अवशेषांचे प्रमाण नव्याने निर्धारित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अलीकडील काही वर्षांत जॉर्डन आणि कतारसारख्या पश्चिम आशियायी देशांनी याबाबतची चिंता व्यक्त केली जात आहे. केवळ पश्चिम आशियायी देश नव्हे तर युरोपियन युनियनमधील अनेक देशांची मागणी पूर्ण करण्यासाठी एफएसएसएआयकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

Basmati Export
Drone: पिकांचे अवशेष जाळणाऱ्यांवर ड्रोनची नजर

राज्याच्या कृषी विभागाने यासंदर्भात पुढच्या आठवड्यात शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत शेतकऱ्यांना अवशेषांविषयीच्या नव्या निकषांची माहिती दिली जाणार आहे. तसेच बासमती उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या ९ कीटकनाशकांच्या वापरास मनाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

या नव्या निकषांचे पालन केल्यास पंजाबचा बासमती तांदळास मागणी वाढणार आहे. राज्याच्या बासमतीस जागतिक बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. जगातील अनेक देश भारताकडून बासमती खरेदी करणार असल्याचे राज्याचे कृषी संचालक गुरविंदर सिंग म्हणाले.

ही आहे शेतकऱ्यांची तक्रार

एफएसएसएआयकडून (FSSAI) नवे निकष लागू केल्यावर राज्यातील बासमती निर्यातीचे प्रमाण घटणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बासमतीसह भातपिकाच्या उत्पादनासाठी शेतकरी १८ कीटकनाशकांचा वापर करतात. एफएसएसएआयने (FSSAI) या कीटकनाशकांचा वापर थांबवण्याचा सल्ला दिला आहे.

एफएसएसएआयच्या नव्या प्रस्तावाचे पालन करणे अवघड आहे. त्यामुळे राज्यातील बासमतीचे उत्पादन, विक्री आणि निर्यातीत घट होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ऑल इंडिया राईस एक्सपोर्टर असोसिएशनने यापूर्वीच एफएसएसएआयच्या नव्या प्रस्तावाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. कीटकनाशक अवशेषांबाबतच्या नव्या निकषांमुळे पंजाबच्या बासमती निर्यातीवर दुष्परिणाम होणार असल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com