रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात ०.५० टक्के वाढ

महिनाभरात दुसऱ्यांदा वाढ; बँकांची सर्व कर्ज महागणार
रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात ०.५० टक्के वाढ
RBIAgrowon

मुंबई ः भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बुधवारी (ता. ८) आपले नवे पतधोरण (Credit Policy) जाहीर केले आहे. यामध्ये बँकेने पुन्हा एकदा रेपो दरात (Repo Rate) ०.५० टक्क्यांची वाढ केली आहे. महिन्याभरातली ही दुसरी वाढ करत कर्जदारांना जोरदार झटका दिला आहे. यामुळे आता रिझर्व्ह बँकेचा रेपो दर (RBI Repo Rate) ४.९० टक्के झाला आहे. या व्याजदर वाढीने गृह कर्जासह (Home Loan) सर्वच प्रकारची कर्जे महागणार आहेत. याशिवाय कर्जफेड करताना ईएमआयसाठी (EMI) कर्जदारांना जादा तरतूद करावी लागेल.

रिझर्व बँकेने रेपो दरात वाढ केल्याने आता सर्वसामान्यांसाठी कर्ज महाग होणार आहेत. कारण आता बँकांच्या कर्जाची किंमत वाढणार आहे. रेपो रेट हा असा दर आहे, ज्या दराने बँका रिझर्व्ह बँकेकडून पैसे घेतात. हा दर वाढल्याने आता बँकांना जास्त दराने कर्ज मिळणार आहे. त्यामुळे बँका ग्राहकांकडून चढ्या दराने व्याज घेणार आहेत.

आरबीआय पतधोरण समितीची बैठक मागील दोन दिवस सुरू होती. या बैठकीत रेपो दरात आणखी ०.५० टक्क्याने वाढवण्यास एकमताने निर्णय घेण्यात आला असल्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. उर्वरित वर्षभरात महागाई दर ६ टक्क्यांवर राहील, असे आरबीआयने म्हटले आहे. महागाईवर बँकेचे बारीक लक्ष आहे. चालू वर्षाचा विकास दर ७.२ टक्के राहील, असा सुधारित अंदाज व्यक्त केला आहे.

दरम्यान, आरबीआय येत्या पतधोरणात रेपो ०.५० टक्का आणि ऑगस्टमध्ये ०.२५ टक्का वाढ करण्याचे ठरवू शकते, असे काही संस्थानी म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी अलीकडेच सांगितले होते, की चलनवाढीचा दर ६ टक्क्यांच्या समाधानकारक पातळीवर आणण्याचा दबाव पाहता, पॉलिसी रेट वाढण्याची शक्यता वाढली आहे. रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर होण्यापूर्वीच मंगळवारी (ता. ७) एचडीएफसी बँकेने कर्जदारांना जोरदार झटका दिला आहे. एचडीएफसी बँकेने एमसीएलआर दर (कर्जदर) ०.३५ टक्क्याने वाढवला आहे. ७ जून २०२२ पासून नवीन कर्जदर लागू झाला असल्याचे एचडीएफसी बँकेने म्हटले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com