
पुणे : केंद्र सरकारने दुसऱ्या सुधारित अंदाज देशातील गहू, तांदूळ (Rice) , मका, हरभरा, मूग, मोहरी, ऊस आणि बार्ली या पिकांचे विक्रमी उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला. तर तूर आणि ज्वारीचं उत्पादन यंदा घटल्याचे स्पष्ट केले.
केंद्र सरकारने २०२२-२३ च्या हंगामातील पीक उत्पादनाचा दुसरा सुधारित अंदाज जाहीर केला. या अंदाजात सरकारने गहू आणि तांदूळ उत्पादन विक्रमी पातळीवर पोचेल, असा अंदाज जाहीर केला.
तर त्याबरोबरच मका, हरभरा, मूग, मोहरी, ऊस आणि बार्ली उत्पादनही विक्री होईल, असा अंदाजही सरकारने व्यक्त केला. सध्या देशात गहू आणि तांदळाचे दर वाढलेले आहेत. त्यातच सरकराने विक्रमी उत्पादनाचे अंदाज व्यक्त केल्याने ग्राहकांना दिलासा मिळू शकतो.
मागील हंगामात वाढलेल्या उष्णतेमुळे गहू उत्पादन कमी झाले होते. मात्र यंदा गहू उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा ५ टक्क्यांनी जास्त राहण्याचा अंदाज आहे. गेल्या हंगामात १ हजार ६८ लाख टन गहू उत्पादन झाले होते. तर यंदा १ हजार १२१ लाख टनांवर गहू उत्पादन पोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
तांदळाचे उत्पादनही मागीलवर्षीच्या १ हजार २९४ लाख टनांवरून १ हजार ३०८ लाख टनांवर पोचेल, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला. यात खरिपातील १ हजार ८७ लाख लाख टन भात उत्पादन होईल, असं म्हटले आहे.
तर रब्बीतील तांदूळ उत्पादन २२७ लाख टनांवर पोचेल, असा अंदाज जाहीर केला. यंदा खरिप आणि उत्पादन काहीसं कमी होणार आहे, मात्र रब्बीतील उत्पादन वाढणार आहे. त्यामुळे यंदा देशातील तांदूळ उत्पादन विक्रमी पातळीवर पोचेल, असा अंदाज सरकारने व्यक्त केला.
देशात यंदा गहू, तांदूळ आणि भरडधान्याचे विक्रमी उत्पादन होणार आहे. त्यामुळे अन्नधान्याचेही उत्पादन विक्रमी पातळीवर पोचणार आहे. देशात यंदा ३ हजार २३५ लाख टन अन्नधान्य उत्पादन होईल, असा अंदाज आहे.
यंदा अन्नधान्य उत्पादन अडीच टक्क्यांनी वाढणार आहे. गेल्या हंगामातील उत्पादन ३ हजार १५६ लाख टन होते.
देशात यंदा भरडधान्याचे ५२७ लाख टन उत्पादन होईल. मागील हंगामात ५११ लाख टनांवर भरडधान्याचे उत्पादन स्थिरावले होते. भरडधान्य उत्पादनाचा हा विक्रम असेल, असंही सरकारने म्हटले आहे.
तुरीचे उत्पादन घटले
सरकारने दुसऱ्या सुधारित अंदाज यंदा २७८ लाख टन कडधान्य उत्पादनाचा अंदाज जाहीर केला. गेल्या हंगामात २७३ लाख टन उत्पादन झाले होते. म्हणजेच यंदा देशात कडधान्याचे उत्पादन विक्रमी पातळीवर पोचेल.
मात्र सरकारने यंदा तुरीचे उत्पादन कमी राहील, असे स्पष्ट केले. सुधारित अंदाजात देशातील तूर उत्पादन ३६ लाख टनांवर स्थिरावेल, असे म्हटले आहे. तर मागील हंगामात ४२ लाख टन उत्पादन झाले होते.
तेलबियांचेही विक्रमी उत्पादन
केंद्र सरकारने यंदा तेलबियांचे उत्पादन विक्रमी ४०० लाख टनांवर पोचेल, असा अंदाज जाहीर केला. गेल्या हंगामात तेलबिया उत्पादन ३७९ लाख टनांवर स्थिरावले होते.
मोहरी उत्पादन यंदा १२८ लाख टनांच्या विक्रमी टप्प्यावर पोचेल. तर खरिपातील तेलबिया उत्पादन २५३ लाख टनांवर पोचल्याचेही दुसऱ्या सुधारित अंदाजात सरकारने स्पष्ट केले.
देशातील अन्नधान्य उत्पादन (लाख टनांत)
शेतीमाल…२०२१-२२…२०२२-२३
गहू… १०७७… ११२१
तांदूळ… १२९४… १३०८
कडधान्य… २७३… २७८
भरडधान्य… ५११… ५२७
तेलबिया… ३७९… ४००
कापूस*… ३११… ३३७
ऊस… ४३९४… ४६८७
कापूस उत्पादन लाख गाठींमध्ये
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.