Chili Export : देशातून लाल मिरची निर्यात २५ टक्क्यांनी वाढली

Chili Production : देशात मिरची उत्पादनात तेलंगणा आघाडीवर आहे. महाराष्ट्रातही नंदूरबारसह काही जिल्ह्यांमध्ये मिरची उत्पादन होते. मिरची पिकावर यंदाही तुडतुड्यांचा प्रादुर्भाव जाणवला.
Red Chili Rate
Red Chili RateAgrowon

Red Chili Rate : भारताने लाल मिरची उत्पादन आणि निर्यातीत चांगली कामगिरी केली. भारताची मिरची निर्यात २०१७-१८ ते २०२१-२२ या काळात २५ टक्क्यांनी वाढली. तर उत्पादनात ७.३ टक्क्यांनी वाढ झाली, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी लोकसभेत दिली.

यासंदर्भात खासदारांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नाला लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. मंत्री पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१७-१८ मध्ये भारतातून ४ लाख ४३ हजार टन लाल मिरची निर्यात झाली होती.

तर २०२१-२२ मध्ये ५ लाख ५७ हजार टनांची निर्यात झाली. म्हणजेच या पाच वर्षांतील काळात देशातून मिरची निर्यात २५ टक्क्यांनी वाढली.

Red Chili Rate
Chakan Market : चाकण बाजारात गुजरातची मिरची

मिरची उत्पादनाबाबत माहिती देताना मंत्री पटेल म्हणाल्या की, मागील पाच वर्षांतील काळात देशातील मिरची उत्पादन ७.३३ टक्क्यांनी वाढले.

देशात २०१७-१८ मध्ये देशात १७ लाख १० हजार टन उत्पादन झाले होते. तर २०२१-२२ मधील उत्पादन १८ लाख ३६ हजार टन मिरची उत्पादन झाले होते.

यंदा उत्पादनात घट

देशात मिरची उत्पादनात तेलंगणा आघाडीवर आहे. महाराष्ट्रातही नंदूरबारसह काही जिल्ह्यांमध्ये मिरची उत्पादन होते. मिरची पिकावर यंदाही तुडतुड्यांचा प्रादुर्भाव जाणवला. त्यामुळं यंदाही उत्पादनात मोठी घट आल्याचे शेतकरी सांगत आहेत.

शेतकऱ्यांना एकरी सरासरी २५ ते ३० क्विंटल उत्पादन मिळते. पण यंदा उत्पादन १० ते १२ क्विंटलपर्यंतच स्थिरावल्याचे शेतकरी सांगत आहेत. तसेच अनेक भागातील शेतकऱ्यांनी ८० टक्क्यांपर्यंत माल विकला आहे.

Red Chili Rate
Climate Change : चिकू, मिरची पिकाच्‍या उत्पादनाला मोठा फटका
देशात तेलंगणातील खम्मम जिल्हा मिरची उत्पादन आघाडीवर आहे. खम्म जिल्ह्यात तेजा वाणाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असते. या वाणाच्या मिरचीची बांगलादेशला विशेष निर्यात होते. देशातून मिरची निर्यातीसाठी चेन्नई बंदल महत्वाचे आहे.
अनुप्रिया पटेल, केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com