कापूस, सोयाबीन, हरभऱ्याच्या दरात घट

गेल्या महिन्यात मका (Maize), हळद (Turmeric) , हरभरा व तूर यांच्या किमती वाढत होत्या. कापूस (Cotton) , सोयाबीन (Soybean) व टोमॅटो यांच्या किमती उतरत्या होत्या.
Agriculture Commodity
Agriculture CommodityAgrowon

डॉ. अरुण कुलकर्णी

फ्युचर्स किमतीः सप्ताह- ९ ते १५ जुलै, २०२२

कापूस, हळद, हरभरा व तूर यांची आवक उतरती आहे. मका व मूग यांची आवक वाढती आहे. कांदा व टोमॅटोची साप्ताहिक आवक अनुक्रमे ३ लाख टन व १ लाख टनाच्या आसपास आहे. गेल्या महिन्यात मका (Maize), हळद (Turmeric) , हरभरा व तूर यांच्या किमती वाढत होत्या. कापूस (Cotton) , सोयाबीन (Soybean) व टोमॅटो यांच्या किमती उतरत्या होत्या. कांद्याच्या किमतीतसुद्धा वाढीचा कल दिसून येत आहे. मुगाच्या किमती रु. ६,२०० ते रु. ६,५०० या दरम्यान होत्या. १५ जुलै पासून NCDEX मध्ये हळद व इतर मसाल्यांच्या पदार्थांमध्ये ऑप्शन्स व्यवहार सुरु झाले.

या सप्ताहातील किमतीतील चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे (Cotton) व कपाशीचे राजकोट मधील स्पॉट भाव (रु. प्रति १७० किलोची गाठी) जून महिन्यात घसरत होते. या महिन्यातसुद्धा ही घसरण चालू आहे. या सप्ताहात कापसाचे भाव ३.४ टक्क्यांनी टक्क्यांनी घसरून रु. ४१,३०० वर आले आहेत. ऑगस्ट डिलिवरी भाव रु. ३९,६९० वर आले आहेत. कपाशीचे स्पॉट भावसुद्धा (प्रति २० किलो) ३.५ टक्क्यांनी घसरून रु. २,१२५ वर आले आहेत.

मका

मक्याच्या (Maize) स्पॉट (गुलाबबाग) किमती जून महिन्यात वाढत होत्या. या महिन्यातसुद्धा त्या वाढत आहेत. या सप्ताहात त्या रु. २,२८८ वर आल्या आहेत. फ्युचर्स (ऑगस्ट डिलिवरी) किमती रु. २,२९९ वर आल्या आहेत. ऑक्टोबर फ्युचर्स किमती रु. २,२९९ वर आल्या आहेत.

हळद

हळदीच्या (Turmeric) स्पॉट (निझामाबाद) किमती जून महिन्यात घसरत होत्या. या सप्ताहात त्या रु. ८,०२७ वर आल्या आहेत. ऑगस्ट फ्युचर्स किमती १.८ टक्क्यांनी घसरून रु. ७,७०२ वर आल्या आहेत.

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (बिकानेर)किमती जूनमध्ये वाढत होत्या. या महिन्यात मात्र त्या घसरत आहेत. या सप्ताहात त्या रु. ४,७६९ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव प्रति क्विंटल रु. ५,२३० आहे.

मूग

मुगाच्या किमती या महिन्यात वाढत आहेत. मुगाची स्पॉट किमत (मेरटा) गेल्या सप्ताहात रु. ६,१०० होती; या सप्ताहात ती २.९ टक्क्यांनी वाढून रु. ६,२७५ वर आली आहे. मुगाचा हमीभाव प्रति क्विंटल रु. ७,७५५ जाहीर झाला आहे. तो गेल्या वर्षापेक्षा ६.६ टक्क्यांनी अधिक आहे. मुगाची आवक वाढती आहे.

सोयाबीन

सोयाबीनची (Soybean) स्पॉट किंमत (इंदूर) जून महिन्यात उतरत होती. याही महिन्यात किमती उतरत आहे. या सप्ताहात ती २.१ टक्क्यांनी घसरून रु. ६,१७९ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव प्रति क्विंटल रु. ४,३०० आहे.

तूर

तुरीची स्पॉट किमत (अकोला) जून महिन्यात वाढत होती. याही महिन्यात किमती वाढत आहेत. तुरीची किमत गेल्या सप्ताहात रु. ६,२५१ वर आली होती. या सप्ताहात ती ६.९ टक्क्यांनी वाढून रु. ६,६८० वर आली आहे. तुरीचा हमीभाव प्रति क्विंटल रु. ६,६०० आहे.

कांदा

कांद्याची (Onion) स्पॉट किमत (पिंपळगाव) गेल्या सप्ताहात रु. १,३९६ होती; या सप्ताहात ती १.८ टक्क्यांनी घसरून रु. १,३७१ वर आली आहे.

टोमॅटो

टोमॅटोच्या किमती परत घसरू लागल्या आहेत. टोमॅटोची स्पॉट किमत (जुन्नर, नारायणगाव) गेल्या सप्ताहात रु. १,५४३ होती; या सप्ताह-अखेर ती रु. १,४८३ पर्यंत आली आहे. टोमॅटोची आवक जूनमध्येसुद्धा वाढती होती.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति १७० किलोची गाठी; कपाशीची किंमत प्रति २० किलो).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com