नाफेडचे हरभरा खरेदी केंद्र पुन्हा चालू करा

‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष राजेगोरे यांचे निवेदन
नाफेडचे हरभरा खरेदी केंद्र पुन्हा चालू करा
Chana ProcurementAgrowon

नांदेड : केंद्र शासनाने हरभरा खरेदीस (Chana Procurement) वाढीव उद्दिष्ट देऊन १८ जूनपर्यंत मुदत वाढ दिली होती. परंतु त्याअगोदरच (ता. ३) पोर्टल (Procurement Portal) बंद केले आहे. त्यामुळे शासनाने पुढाकार घेत शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी (Procurment Of Chana) पूर्ण होत नाही, तोपर्यंत खरेदी केंद्र (Procurement Center) चालू ठेवावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत राजेगोरे (Hanumant Rajegore) यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात रब्बी हंगामात हरभरा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. एकाच वेळी हरभऱ्याची बाजारात आवक झाल्यामुळे दर पडत असतात. चालू वर्षी खुल्या बाजारात ४००० ते ४५०० पर्यंत दर असताना हमीभाव खरेदी केंद्रावर प्रति क्विंटल ५२३० रुपये दर मिळत आहेत. नाफेडमार्फत होणाऱ्या हमीभाव खरेदी केंद्रामुळे बाजारात कमी दराने हरभरा विकण्याएवजी खरेदी केंद्रावर हरभरा विकण्यास शेतकरी प्राधान्य देत आहेत.

आजही खरेदीसाठी आगावू नोंदणी करून सुद्धा शेतकऱ्यांकडे लाखो क्विंटल हरभरा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे शासनाने पुढाकार घेत हरभरा खरेदीसाठी आगावू नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून हरभरा खरेदी जोपर्यंत पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत हरभरा हमीभाव खरेदी केंद्र चालू ठेवावेत किंवा ज्या नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करणे शक्य नाही, अशा शेतकऱ्यांना भाव फरक अनुदान स्वरूपात द्यावे, अशी मागणी केली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत राजेगोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com