साखर निर्यातीवरील निर्बंध शिथिल करावेत

‘इस्मा’ची मागणी; अन्न मंत्रालयाच्या सचिवांना पत्र
साखर निर्यातीवरील निर्बंध शिथिल करावेत
Sugar ExportAgrowon

कोल्हापूर : केंद्र सरकारने साखरनिर्यातीवर लावलेले निर्बंध (Sugar Export Ban) शिथिल करावेत, अशी मागणी इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (Indian Sugar Mills Association) (इस्माने) केली आहे. अन्न मंत्रालयाच्या सचिवांना याबाबत दिलेल्या पत्रात त्यांनी या निर्बंधांमुळे तांत्रिक अडथळे येत असल्याचे स्पष्ट केले आहे. अध्यक्ष आदित्य झुनझुनवाला यांनी हे पत्र लिहिले आहे.

केंद्राने २४ मे रोजी साखरेवर निर्बंध घालण्याची घोषणा केली आणि त्याच दिवशी सर्व कारखान्यांना अटी-शर्तींचे पत्र पाठवले. यंदाचा हंगाम जादा साखर उत्पादन होऊन सुद्धा नियंत्रणात आहे. साखरेच्या चीनची स्थानिक बाजारात फारशा वाढलेल्या नाहीत. ऑक्टोबरच्या सुरुवातीला जागा साखर शिल्लक असणे केंद्राला उचित वाटत असले तरी पुरेशा प्रमाणात साखर निर्यात होऊनसुद्धा ऑक्टोबरला देशांतर्गत विक्रीसाठीचा साठा शिल्लक राहू शकतो.

केंद्राने निर्बंध घातल्यानंतर साखर उद्योगांमध्ये काहीशी अस्वस्थता निर्माण झाली आहे. सध्या पावसाळा तोंडावर आहे आणि आता निर्यातीला काहीच दिवस उरले आहेत. साखर कारखान्यांनी जादा साखर बाहेर पाठवण्यासाठी निर्यात सुरू केली आहे. शेवटच्या टप्प्यात मात्र अडथळे आल्याचे चित्र आहे. जर निर्यात नियंत्रित झाली तर अपेक्षित शंभर लाख टनांची अपेक्षा ही पूर्ण होणार नाही, अशी शक्यता आहे. याचा परिणाम शेवटच्या टप्प्यातील शेतकऱ्यांच्या ऊस बिलाच्या थकबाकीवर ही होऊ शकतो, अशी भीती आहे. केंद्राने या सर्व स्थितीचा पुन्हा एकदा सारासार विचार करून निर्यातीवरील निर्बंधात सूट द्यावी, असे या पत्रात म्हटले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com