Wheat : गहू पीठ निर्यातीवर बंधने

मैदा, रवा आदी गहू पदार्थ निर्यातीसाठी परवानगी बंधनकारक
Wheat Export
Wheat ExportAgrowon

पुणेः गहू निर्यातबंदी (Wheat Export Ban) केल्यानंतर देशातून पिठाची निर्यात (Wheat Flour Export) वाढली होती. त्यामुळे सरकारने आता पीठ निर्यातीवर बंधने (Restriction On Wheat Flour Export) आणली. गहू पीठ गहू पिठासोबतच मैदा, रवा आदी पदार्थ निर्यातीसाठी आता मंत्रिस्तरीय समितीची परवानगी बंधनकारक असल्याचे परकीय व्यापार महासंचालनालयाने स्पष्ट केले.

Wheat Export
Wheat Export Ban: गहू निर्यातबंदीवरून भारतावर बड्या देशांची टीका

जागतिक पातळीवर गहू आणि गहू पिठाची टंचाई कायम आहे. त्यामुळे दर वाढले. अनेक देश आयातीसाठी निविदा काढत आहेत. परिणामी गहू आणि गहू पिठाला मोठी मागणी आहे. भारतातूनही चालू हंगामात विक्रमी गहू आणि पीठ निर्यात झाली. मात्र देशात घटलेले उत्पादन, निम्म्यावर आलेली सरकारी खरेदी आणि दरवाढ यामुळे केंद्र सरकारने १३ मे रोजी गहू निर्यातबंदी केली. त्यानंतर देशातून गव्हाच्या पिठाची निर्यात वाढली. परंतु गहू निर्यातबंदीनंतर पिठाचे दर काहीसे नरमले होते. तरीही सरकारने पीठ निर्यातीवर निर्बंध आणले. गहू पिठासोबतच मैदा, रवा आदी पदार्थ निर्यातीसाठी आता मंत्रिस्तरीय समितीची परवानगी बंधनकारक असेल. यासंबंधीची अधिसूचना परकीय व्यापार महासंचालनालयाने बुधवारी काढली. मात्र गहू पीठ निर्यात धोरण मुक्त असेल निर्यातीवर कुठलीही बंदी नाही. मात्र निर्यात करताना मंत्रिस्तरिय समितीची परवानगी बंधनकारक करण्यात आली, असे अधिसुचनेत म्हटले आहे.

Wheat Export
National Food Security Act : उत्तर प्रदेश, गुजरातला हवा वाढीव गहू

या निर्णयाची अंमलबजावणी १२ जुलैपासून होणार आहे. ही अधिसूचना जारी होण्याआधी निर्यातीसाठी जहाजांमध्ये भरलेले पीठ तसेच निर्यात प्रक्रियेसाठी सीमाशुल्क विभागाकडे दिलेल्या पिठाला या निर्णयातून वगळण्यात आल्याचेही अधिसुचनेत स्पष्ट करण्यात आले.

जागतिक पातळीवर रशिया-युक्रेन युध्दामुळे गव्हाची टंचाई निर्माण झाली. त्यामुळे भारतातून गहू आणि गव्हाच्या पदार्थांची निर्यात वाढली. एप्रिल महिन्याचा विचार करता गेल्यावर्षीच्या तुलनेत गहू पिठाची निर्यात जवळपास चार पटीने अधिक झाली. एप्रिल महिन्यात ९६ हजार टन पीठ निर्यात झाले. तर मागील वर्षी याच महिन्यातील निर्यात २६ हजार टनांवर होती. मे महिन्यात तर गहू निर्यातबंदीनंतर पीठ निर्यात यापेक्षा जास्त झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे सरकराने हा निर्णय घेतल्याचे जाणकारांनी सांगितले.

जाणकारांच्या मते, या निर्बंधामुळे एका रात्रीत गहू पीठ निर्यात करून पैसा कमविणाऱ्या व्यापाऱ्यांवर बंधने येतील. गहू निर्यातबंदी झाल्यानंतर व्यापारी नफेखोरीसाठी मोठ्या प्रमाणात पिठाची निर्यात करत होते, त्यांना आता आळा बसेल, असा दावाही जाणकारांनी केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com