Wheat market : गव्हाच्या दरात पुन्हा सुधारणा

देशात सध्या गव्हाचा पुरवठा कमी असल्याची चर्चा आहे. तसेच नाफेडकडील बफर स्टाॅकही गेल्यावर्षीपेक्षा निम्माही नाही.
खानदेशात गव्हाच्या दरात सुधारणा
खानदेशात गव्हाच्या दरात सुधारणाAgrowon

पुणेः देशात सध्या गव्हाचा (Wheat) पुरवठा कमी असल्याची चर्चा आहे. तसेच नाफेडकडील बफर स्टाॅकही गेल्यावर्षीपेक्षा निम्माही नाही. त्यामुळे गव्हाच्या दरात पुन्हा सुधारणा होत आहे. सध्या गव्हाला देशभरात २५०० रुपये ते २ हजार ७४० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे.

देशात गव्हाच्या दरात पुन्हा वाढ होत आहे. सध्या रब्बी हंगामातील (Rabi season) गहू पेरणी झाली. मात्र नवा गहू एप्रिल महिन्यापासून बाजारात येण्यास सुरुवात होईल. तोपर्यंत सरकारला बफर स्टाॅकमधील साठ्यावर गरज भागवावी लागेल.

सरकारकडे सध्या गेल्यावर्षीपेक्षा गव्हाचा साठा जवळपास निम्म्यानं कमी आहे. याची जाणीव असल्याने व्यापारी स्टाॅक मागे ठेवत आहेत. व्यापारी दर वाढण्याची प्रतिक्षा करत आहेत. तसेच गरजेप्रमाणं सध्या विक्री सुरु असल्याचं जाणकार सांगतात.

देशातील बहुतांशी बाजारांमध्ये गव्हाच्या दराने २५०० रुपयांचा टप्पा पार केला आहे. दिल्ली येथे आज पुन्हा एकदा २ हजार ७४० रुपये दराने गहू विकला गेला. तर आगरा बाजारात गव्हाने २६२५ रुपयांचा टप्पा गाठला. तर गहू पीठ २९०० रुपये आणि मैदा २९५० रुपयाने विकला गेला. महाराष्ट्रातही गहू २५५० ते २७२५ रुपयाने विकला गेला.

खानदेशात गव्हाच्या दरात सुधारणा
Inter-Crop Study : बारा धान्य आंतरपीक पद्धतीचा अभ्यास

गव्हाने २८०० रुपयांचा टप्पा पार केल्यास व्यापारी नफा वसुलीसाठी विक्री करु शकतात. कारण गव्हाचे दर जास्त वाढल्यास सरकार दर नियंत्रणासाठी पावले टाकू शकते. ही शक्यता लक्षात घेऊन अनेक बाजार विश्लेषक व्यापाऱ्यांना नफा वसुली करण्याचा सल्ला देत आहेत.

सध्या केंद्राकडील गव्हाचा बफर स्टाॅक घटला आहे. नाफेडकेडील गव्हाचा बफर स्टाॅक २२२ लाख १८ हजार टनांपर्यंत कमी झाला. तर मागीलवर्षी याच काळातील साठा ४६८ लाख २० हजार टनांवर होता. म्हणजे यंदा केंद्राकडे गेल्यावर्षीपेक्षा जवळपास २४६ लाख ३४ हजार टनाने कमी आहे. म्हणजेच निम्म्याने कमी आहे. याचा परिणाम बाजार दरावर होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com