अनुदानावरील सोयाबीनचा तुटवडा

महाबीजकडून अनुदानावर पुरवठा करण्यात येत असलेल्या सोयाबीन बियाण्यांचा (Soybean Seeds) दर प्रति किलो १४० रुपये आहे. त्यावर ४० रुपये अनुदान दिल्या जाते. शेतकऱ्यांना ते १०० रुपये प्रति किलो पडते.
Soybean Seeds
Soybean SeedsAgrowon

अमरावती : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (गळीत धान्य) अंतर्गत प्रमाणित बियाणे वितरण घटकांतर्गत सोयाबीन (Soybean) बियाण्यांचा तुटवडा पडल्याने कृषी विभागास शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. ‘महाबीज’कडून या बियाण्यांचा पुरवठा करण्यात येत असून, अमरावती जिल्ह्यास १७४ क्विंटल ९० किलो इतका पुरवठा झाला आहे. पंधरा वर्षांतील बियाणे अनुदानावर शेतकऱ्यांना वितरित करण्यात येतात.

महाबीजकडून अनुदानावर पुरवठा करण्यात येत असलेल्या सोयाबीन बियाण्यांचा (Soybean Seeds) दर प्रति किलो १४० रुपये आहे. त्यावर ४० रुपये अनुदान दिल्या जाते. शेतकऱ्यांना ते १०० रुपये प्रति किलो पडते. एक बॅग ३० किलोची आहे. अमरावती जिल्ह्यासाठी ५१० क्विंटलचे लक्ष्यांक निश्‍चित करण्यात आले होते. २० लाख ४० हजार रुपये किमतीचे हे बियाणे १४ हजार रुपये प्रतिक्विंटल होते. त्यावर ४ हजार रुपये प्रती क्विंटल अनुदान दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या पदरात १० हजार रुपये क्विंटल दराने पडते.

महाबीजने जिल्ह्यासाठी ५१० क्विंटलचे लक्ष्यांक निश्‍चित केल्यानंतर पुरवठा मात्र १७४ क्विंटलचाच केला. त्यामुळे कृषी विभागाने तालुकानिहाय वितरणाचे नियोजन केले. त्यानुसार नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानावर केवळ एकच बॅग मिळू शकली आहे. आतापर्यंत १७४ क्विंटल बियाण्यांचे (Soybean Seeds) वाटप ५८३ शेतकऱ्यांना झाले आहे. हे वाटप लॉटरी पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्यास ३० किलोची एक बॅग याप्रमाणे करण्यात आल्याचे कृषी विभागाने सांगितले.

बियाण्यांची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक असून, ज्यांना बियाणे मिळाले त्यांना उर्वरित बियाणे बाजारभावाने बाजारपेठेतून खरेदी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला असून, त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. या शेतकऱ्यांना उत्तर तरी काय द्यावे, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा झाला आहे.

जिल्ह्यासाठी लक्ष्यांक : ५१० क्विंटल , प्रत्यक्ष पुरवठा : १७४.९० क्विंटल

३० किलो बॅगची संख्या : ५८३

तालुकानिहाय वितरण : अमरावती (६०), भातकुली (५८), चांदूररेल्वे (५५) धामणगावरेल्वे (५५), नांदगाव खंडेश्‍वर (१००), मोर्शी (४०), वरुड (८), तिवसा (४५), चांदूरबाजार (३८), अचलपूर (२५), अंजनगावसुर्जी (३३), दर्यापूर (२०), धारणी (२४), चिखलदरा (२२).

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com