लघू उद्योगाच्या विकासासाठी कार्यरत ः सीडबी

भारतीय लघू उद्योग आणि विकास बॅंक (SIDBI) ही मुख्यतः लहान आणि मध्यम उद्योगांना (MSME) कर्ज देऊन विकासामध्ये मदत करते.
लघू उद्योगाच्या विकासासाठी कार्यरत ः सीडबी
SIDBIAgrowon

भारतीय लघू उद्योग आणि विकास बॅंक (SIDBI) ही मुख्यतः लहान आणि मध्यम उद्योगांना (MSME) कर्ज देऊन विकासामध्ये मदत करते. या उद्योगांसाठी तंत्रज्ञान, उत्पादनांच्या विपणन, व्यावसायिकीकरण आणि विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करते.

या कर्जाचे काही प्रकार पुढील प्रकारे ः

१) प्रत्यक्ष कर्ज २) अप्रत्यक्ष कर्ज ३) सरकारी योजनेअंतर्गत कर्ज आणि ४) सूक्ष्म वित्त (मायक्रोफायनान्स) अंतर्गत विशिष्ट कर्ज उत्पादने.

वैशिष्ट्ये ः

१) लहान आणि मध्यम उद्योगासाठी कर्ज

२) लहान उद्योगासाठी बिल सवलत सेवाही पुरवते.

३) बॅंक, बॅंकीगशिवाय वित्तीय कंपन्या (एनबीएफसी), लहान वित्त कंपन्यांना आणि त्यांच्या योजनांसाठी आर्थिक मदत करते. त्यातून लहान आणि मध्यम उद्योगांना कर्ज मिळू शकते.

४) भाडेकरार, खरेदी, उभारणी अशा सेवांना वित्तीय सेवा पुरवणे.

५) निर्यातीसाठी उद्योगांना मदत करते.

६) महिला उद्योजकांना व वंचित समूहांना कर्ज देते.

मुदत कर्ज ः

१) नव्या लहान आणि मध्यम उद्योगाच्या उभारणीसाठी, जुन्या उद्योगाच्या विस्तार, आधुनिकीकरण, दर्जा प्रमाणिकरण आणि तंत्रज्ञान सुधारणांसाठी दिले जाते.

२) आवश्यक यंत्रे खरेदीसाठी

३) मार्केटिंग संबंधीच्या विविध उपक्रमासाठी.

मुदत कर्ज ः

-रक्कम - किमान १० लाख रुपये

-कालावधी - कमाल ८ ते १० वर्ष (१८ महिन्यांपर्यंतच्या मोर्टरियम म्हणजेच हप्ता नाही कालावधीसह)

-प्रक्रिया शुल्क ः मंजूर झालेल्या कर्जाच्या १ टक्के.

-उद्योजक किंवा प्रमोटरचा हिस्सा ः नवीन उद्योग - ३३ टक्के

-उत्तम सुरू असलेल्या सध्याच्या उद्योगासाठी -२५ टक्के.

-डेट इक्विटी रेशो (DER) - ३:१ पेक्षा अधिक नको.

-अॅसेट कव्हरेज रेशो (ACR) - १.००

-FACR समवेत नव्या कंपनीसाठी -१.४

- सध्याच्या युनिटसाठी - १.३

लघु आणि मध्य उद्योगासाठी सुरक्षित व्यवसाय कर्ज ः

व्यवसायासंबधी नियोजित आणि अनियोजित खर्चासाठी कर्ज दिले जाते. त्याचे प्रमाण उद्योगाकडून दिलेली कोलॅटरल सिक्युरिटी आणि व्यवसायाच्या स्तरानुसार ठरते.

पात्रता निकष ः सध्या सुरू असलेल्या लघू आणि मध्यम उद्योगाचा गेल्या तीन वर्षामध्ये रोख नफा आणि दोन वर्षामध्ये निव्वळ नफा मिळवलेला असावा. हा उद्योग कधीही बॅंकेचा थकबाकीदार नसावा. अन्य अटी व्यवसाय आणि त्या वेळेवर ठरतात.

अधिक माहितीसाठी ः www.sidbi.in

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.