Wheat : गहू, आटा, रव्याचे दर वाढण्याचे संकेत

सर्वसाधारण गहू २७ रुपयांवरून ३१ रुपयांवर चांगल्या प्रतीचा गहू ३२ वरून ३५ रुपयांवर गेला आहे. येत्या काही दिवसांत आणखी भाववाढीची शक्यता आहे.
Wheat Export
Wheat ExportAgrowon

नागपूर ः रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे (Russia Ukraine War) भारतातील गव्हाची मागणी (Wheat Demand) वाढली होती. भारतातून १ कोटी १० लाख टन गव्हाची निर्यात (Wheat Export) करून विदेशी चलन मिळविले; मात्र अवकाळी आलेल्या पावसामुळे उत्पादन (Wheat Production) घटल्याने भारतातील कोठागारातील गव्हाचा साठा कमी झाला आहे. काही उद्योगपतींनी गव्हाचा साठा करून ठेवल्याने तुटवडा (Wheat Shortage) निर्माण झाला आहे. परिणामी, गव्हाच्या दरात मागील दोन वर्षांच्या तुलनेत विक्रमी वाढ झाली आहे.

Wheat Export
Wheat export: ३० लाख टन गहू निर्यातीचे अर्ज फेटाळणार?

सर्वसाधारण गहू २७ रुपयांवरून ३१ रुपयांवर चांगल्या प्रतीचा गहू ३२ वरून ३५ रुपयांवर गेला आहे. येत्या काही दिवसांत आणखी भाववाढीची शक्यता आहे. यासोबतच आटा, मैदा आणि रव्याचेही भाव वाढण्याचे संकेत आहेत. भारतात यंदा विक्रमी गव्हाचे निर्यात होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी ३८.५ लाख टन गव्हाची निर्यात झाली होती. ती यंदा १ कोटी १० लाख टनांवर गेली आहे. बाजारातील गव्हाची मोठ्या प्रमाणावर खरेदी बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून होत असल्याने देशातील अनेक फ्लोअर मिलला गव्हाचा तुटवडा भासतो आहे. नवीन येणाऱ्या गव्हाची आवकही कमी झालेली आहे. परिणामी, केंद्र सरकारने निर्यातीवर काही प्रमाणात निर्बंध आणले आहे. तरीही गहू २८०० ते ३२०० रुपये प्रति क्विंटल झाला आहे. अजूनही प्रतिकिलो तीन ते चार रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. यासोबतच मैदा, आटा, रव्याचेही भाव वाढण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

पावसाळा सुरू होताच बाजारात तुरीची आवक कमी झाल्याने भाववाढीला चालना मिळाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी तूर डाळीचे भाव प्रति क्विंटल ८५००- ८६०० रुपये होते ते ९५०० ते ९८०० रुपयांवर पोहोचले आहेत. दसरा आणि दिवाळीच्या तोंडावर त्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हरभरा डाळीचे भावही प्रतिक्विंटल ५४०० ते ५८०० रुपयांवर गेले आहेत. तूर डाळीचे दर किरकोळ बाजारात १२० रुपये किलो झाले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत हे भाव वाढलेले आहेत. तूर व हरभराडाळींच्या दरात आणखी भाववाढीची शक्यता आहे. याला कृत्रिम टंचाईचा वास आहे. सरकारने वेळीच हस्तक्षेप केला नाही, तर तूरडाळीचे भाव पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. इंडोनेशियातून तेलाची आवक सुरू झाल्याने सोयाबीन, पाम तेलाच्या दरात सतत घसरण सुरू आहे. सोयाबीन तेल १५ किलो डब्याचा दर आता २२७० रुपये झाला आहे.

तूरडाळ आणि गव्हाच्या दरात गेल्या पंधरा दिवसांत वाढ झाली आहे. केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीवर निर्बंध आणले असले तरी भारतातील गव्हाचा साठाच कमी झाल्याने दरात सतत वाढ होत आहे. यासोबतच आता मैदा, रवा आणि आट्याचे दरही वाढू लागले आहे.
प्रभाकर देशमुख, अध्यक्ष, नागपूर किरकोळ व्यापारी संघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com