अक्षय तृतीयेपूर्वीच चांदीच्या दरात ४ हजारांची घसरण

सोने ३५० रुपयांनी नरमले : मोठी विक्री शक्य
Silver Rate
Silver RateAgrowon

जळगाव : सोने, चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. गेल्या चार दिवसांत चांदीच्या दरात (Silver Rate) ६९ हजारांवरून ६५ हजारांपर्यंत घसरण झाली आहे. तर सोन्याच्या दरात (Today's Gold Rate) ५२ हजार ७०० वरून ५२ हजार २५० घसरण झाली. म्हणजेच चांदीच्या दरात चार हजारांची तर सोन्याच्या दरात ३५० रुपयांची (तोळ्यामागे) गेल्या सात दिवसांत घसरण झाली आहे. ही गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी आहे. मंगळवारी (ता. ३) अक्षय तृतीया आहे या दिवशी सोन्याला अधिक मागणी असते. यामुळे सोने बाजारात उत्साहाचे वातावरण आहे.

गेल्या महिन्यात रशिया व युक्रेनमधील युद्धामुळे सोने, चांदीच्या दरात सातत्याने ८ मार्चपर्यंत वाढ होत गेली. नंतर मात्र युद्धात शिथिलता येताच सोने, चांदीच्या दरात घसरण सुरू झाली आहे. मागील महिन्यात सोन्याच्या दरात २७०० ची तर चांदीच्या दरात २ हजारांची घसरण झाली होती. युद्ध सुरू झाल्यापासून सोन्याच्या दरात तीन ते चार हजारांची वाढ झाली होती. चांदीच्या दरात नऊ हजारांची वाढ झाली होती. याचा फायदा अनेक गुंतवणूकदारांनी घेतला. सोने, चांदीची मोड विकून नफा कमविला आहे. गेल्या काही महिन्यांपासून युद्धात शिथिलता येत असल्याचे चित्र आहे. याचा परिणाम म्हणून सोने, चांदीच्या दरात घसरण सुरू आहे. गेल्या २७ एप्रिलपासूनचा विचार करता सोन्याचे दर प्रतितोळा ५२ हजार ७०० होते. तर चांदीचा दर प्रतिकिलो ६९ हजार होता. ते आज (ता. ३०) अनुक्रमे ५२ हजार ३५० व ६५ हजारांपर्यंत खाली आले आहेत.

अक्षय तृतीयेला मोठा मुहूर्त

अक्षय तृतीयेला घेतलेले सोने अक्षय (चिरकाल) टिकते. यामुळे या दिवशी सोने खरेदीची मोठी परंपरा आहे. या दिवशी सोन्याची मोठी विक्री होईल. यासाठी सोने-चांदी व्यापाऱ्यांनी सोन्याचे दागिने घडविण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी (ता. ३) अक्षय तृतीया आहे. या दिवशी दर कसे असतील हे सोमवारी समजेल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

सोने, चांदीचे दर असे (जीएसटी विना)

तारीख--सोने (प्रतितोळे)--चांदी (प्रतिकिलो)

२२ एप्रिल--५२ हजार ८००--६९ हजार

२३ एप्रिल--५२ हजार ७००--६९ हजार

२६ एप्रिल--५२ हजार--६८ हजार

२७ एप्रिल--५२ हजार ७००--६९ हजार

३० एप्रिल--५२ हजार ३५०--६५ हजार

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com