अमरावती बाजारात सोयाबीनची आज 14 मे रोजी 2016 क्विंटल आवक झाली. आवक झालेल्या सोयीबनला(soybean) आज किमान 6400 रुपये तर कमाल 6735 रुपये दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर 6568 रुपयांवर होता. अमरावती बाजारात आज सोयाबीन आवक काहीशी वाढली होती.अकोला बाजारात सोयाबीनची 854 क्विंटल आवक झाली असून किमान भाव 6100 रुपये होता. तर कमाल भाव(rate) 6780 रुपयांचा मिळालाय. या मालाला सर्वसाधारण 6500 चा भाव मिळालाय.चिखली बाजारात आवक 249 क्विंटल राहिली. यावेळी या सोयाबीनला किमान 6250 रुपये दर मिळाला. तर कमाल व्यवहार 6800 रुपयाने झाले. सरासरी दर 6525 रुपये मिळाला.तसेच मुर्तिजापूर बाजारातील आवक 570 क्विंटलवर होती. यावेळी सोयाबीनला 6550 रुपये दर मिळाला. तर कमाल दर 6790 रुपयांवर होते. तर जास्तीत जास्त आवक मालाला सर्वसाधरण दर 6665 रुपये मिळाला.