देशातील सोयाबीन लागवड क्षेत्रात वाढ होणार: सोपा

गेल्या हंगामात सोयाबीनला चांगला भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे ओढा वाढेल.
देशातील सोयाबीन लागवड क्षेत्रात वाढ होणार: सोपा
SoybeanAgrowon

देशात यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनची (Soybean) लागवड वाढेल, असे सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपाचे (SOPA) कार्यकारी संचालक डी.एन.पाठक (N D Pathak) यांनी सांगितले. गेल्या हंगामात सोयाबीनला चांगला भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे ओढा वाढेल. कर्नाटकसारख्या (Karnatak) राज्यात सोयाबीनची लागवड सुरू झाली आहे. परंतु मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यांत मात्र शेतकरी मॉन्सूनकडे डोळे लावून बसले आहेत.

मॉन्सून कधी येतो आणि पावसाचे प्रमाण कसे राहते यावर सोयाबीन पिकाचे भवितव्य अवलंबून आहे. उत्तर कर्नाटकात पेरण्या सुरू झाल्या आहेत. कलबुर्गी आणि बिदर या परिसरात शेतकरी तुरीऐवजी सोयाबीनला पसंती देत असल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रात मात्र सोयाबीनला कापसाची तगडी स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कापसाला विक्रमी भाव मिळाल्यामुळे कापसाची लागवड वाढण्याची चिन्हे आहेत. कडधान्य पिकांखालील काही क्षेत्र कापूस आणि सोयाबीनकडे वळतं होईल, असा अंदाज आहे.

“सोयाबीनला मिळणाऱ्या चांगल्या दरामुळे सोयाबीन क्षेत्रात वाढ होईल,”असे सोपाचे कार्यकारी संचालक डी. एन. पाठक म्हणाले. सोपाच्या मते, २०२१ मध्ये सोयाबीन लागवडी क्षेत्र ११९.३८ लाख हेक्टर इतके होते. तर कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार १२३ लाख हेक्टर क्षेत्र सोयाबीन लागवडी खाली होते.

इंदूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सोयाबीन रिसर्चच्या संचालक नीता खांडेकर यांनी सांगितले की, "यंदा सोयाबीनमध्ये विविध वाण उपलब्ध होतील. यंदा हवामान चांगले राहील, अशी आम्हाला आशा आहे."

दरम्यान, गेल्यावर्षी मे महिन्यात ६ लाख टन सोयाबीनचे गाळप झाले होते. यावर्षी याच कालावधीत त्यामध्ये वाढ होऊन ७ लाख टन सोयाबीन गाळप झाले आहे. यंदा एप्रिलमध्ये कमी गाळप झाले, कारण शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी त्यांचा माल रोखून धरला होता.

साधारणतः ऑक्टोबर ते एप्रिल महिन्यात सोयाबीनचे गाळप होते. या कालावधीत यंदा ५३ लाख टन सोयाबीन गाळप झाले. तर गेल्या वर्षी ऑक्टोबर-एप्रिल दरम्यान ७५ लाख टन सोयाबीन गाळप करण्यात आले. सोपाच्या अंदाजानुसार, व्यापारी आणि शेतकऱ्यांकडे मेच्या अखेरपर्यंत ५५.३९ लाख टन सोयाबीनचा साठा होता. दरम्यान, सोयाबीनचे दर पुन्हा वाढू लागले आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com