Soybean Market : देशातील सोयाबीन दर दबावात का ?

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडच्या दरात मोठी वाढ झाली. सोमवारी सोयापेंडचे वायदे ४७७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर सुरु झाला होता.
Soybean
SoybeanAgrowon

Soybean Rate market : सोयाबीनची (Soybean) भावपातळी मागील महिनाभरापासून कमी झालेली आहे. मध्यंतरीच्या काळात शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री वाढवली होती. पण दर जास्त नरमल्यानंतर शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री पुन्हा कमी केली.

पण तरीही सोयाबीनचे भाव (Soybean Bhav) दबावातच आहेत. पण देशातून आता सोयापेंड निर्यात वाढली. त्यामुळे सोयाबीनचे भाव सुधारतील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

चालू आठवड्याच्या सुरुवातील म्हणजेच, सोमवारी ३० डिसेंबरला सोयाबीन बाजार १५.२४ डाॅलर प्रतिबुशेल्सवर सुरु झाला. रुपयात सांगायचं झाल तर ४ हजार ६०० रुपयांवर बाजार सुरु झाला. चालू आठवड्यातही सोयाबीनच्या दरात मोठे चढ उतार झाले.

३१ डिसेंबरला सोयाबीनने सर्वाधिक १५.४० डाॅलरचा टप्पाही गाठला होता. तर आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शुक्रवारी सोयाबीन बाजार १५.३२ डाॅलरवर बंद झाला. रुपयात हा भाव ४ हजार ६२५ रुपये होतो.

म्हणजेच या आठवड्यात सोयाबीन दरात काहीशी सुधारणा झाली. विशेष म्हणजे या आठवड्यात सोयाबीनचे किमान दरपातळी १५ डाॅलरच्या वरच होती.

Soybean
Cotton, Soybean Market : कापूस, सोयाबीन बाजारात काय सुरु आहे?

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडच्या दरात मोठी वाढ झाली. सोमवारी सोयापेंडचे वायदे ४७७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर सुरु झाला होता.

आठवडाभर दरात चढ उतार राहील्यानंतर शुक्रवारी दरानं हंगामातील विक्रमी ४९९ डाॅलरचा टप्पा गाठला होता. मात्र बाजार ४९६ डाॅलरवर बंद झाला. म्हणजेच या आठवड्यात सोयापेंडच्या दरात टनामागं १९ डाॅलरची वाढ झाली होती.

Soybean
#Shorts : एका तासात ५ एकर क्षेत्रावरील सोयाबीन काढणारे मशिन| ॲग्रोवन

देशातील बाजार दबावातच

मात्र देशातील दराचा विचार करता सोयाबीनचा बाजार आठवडाभर दबावातच राहीला. चढ उतारही अगदी थोड्या प्रमाणात झाले.

मागील अठवडाभर सोयाबीनची सरासरी दरपातळी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्या होती. तर सोयापेंडचे दर ४० हजार ते ४१ हजार रुपये प्रतिटनाच्या दरम्यान आहेत.

भारताची सोयापेंड स्वस्त

आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार करता भारताचं सोयाबीन ५६५ ते ५७५ डाॅलर प्रतिटन पडते. तर आंतरराष्ट्रीय बाजारात हजरचे दर ५७० ते ५८५ डाॅलर प्रतिटन आहेत. म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारातील दरापेक्षा आपलं सोयापेंड स्वस्त आहे. त्यामुळे देशातून सोयापेंड निर्यात वाढली आहे.

दबाव कशामुळे?

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील निर्यातीसाठी सौदेही वेगाने होत आहेत. त्यामुळं मार्च महिन्यातील सोयापेंड निर्यात विक्रमी पातळीवर पोचेल, असा अंदाज सोयापेंड निर्यातदारांनी व्यक्त केला. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंड तेजीत आहेत.

पण देशात खाद्यतेलाची आयात वेगाने सुरु आहे. सध्या देशात खाद्यतेलाचा साठा विक्रमी पातळीवर आहे. त्यात सोयाबीनचा साठ्याचाही सामवेश आहे.

त्यामुळे सोयातेलाच्या दरावर दबाव आहे. पण सोयापेंडला मागणी असल्याने सोयाबीनचे दर जास्त दिवस दबावात राहणार नाहीत, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com