Soybean Market
Soybean MarketAgrowon

Soybean Market : सोयाबीनचे दर मागील काही दिवसांपासून स्थिर

सध्या सोयापेंडलाचे भाव ४४ हजार ते ४५ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. त्यातच देशात खाद्यतेलाचे भाव टिकून आहेत.

Soybean Rate : उद्योगांना अपेक्षेप्रमाणं मार्च महिन्यात सोयाबीनची आवक (Soybean Arrival) सरासरीपेक्षा जास्त आहे. मार्च महिन्यात सोयाबीनची विक्री वाढल्यामुळं दरही दबावात आहेत. सोयाबीनचे भावात मागील दीड महिन्यापासून विशेष तेजी मंदी दिसली नाही.

त्यामुळं आर्थिक नड असलेले शेतकरी सोयाबीन विकत आहेत. याचाही दबाव सोयाबीनवर येत आहे, असे व्यापारी सांगित आहेत.

सोयाबीन दरात मागील दीड महिन्यापासून तेजी मंदी दिसली नाही. सोयाबीनचे भाव स्थिर आहेत. देशातून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात सोयापेंड निर्यात वाढली. त्यामुळे सोयाबीन दर सुधारण्याची शक्यता होती.

सोयाबीनला किमान ५ हजार ५०० रुपये दर मिळणे अपेक्षित होते. पण उद्योगांकडून सोयाबीनला दरवाढ देण्यात आली नाही. सोयाबीनचे दर मागील अनेक दिवसांपासून ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहेत.

Soybean Market
Marathwada Soybean Rate: मराठवाड्यातील कोणत्या बाजारात सोयाबीनचे दर सर्वाधिक राहिले?

सध्या सोयापेंडलाचे भाव ४४ हजार ते ४५ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. त्यातच देशात खाद्यतेलाचे भाव टिकून आहेत. त्यामुळे सोयाबीनला किमान ५ हजार ५०० रुपये दर मिळणे अपेक्षित होते.

एप्रिल महिन्यानंतर सोयापेंड निर्यातीसाठी विचारणा कमी असल्याचे निर्यातदारांनी सांगितले. मार्च महिन्यात विक्रमी निर्यात होण्याचा अंदाज आहे. पण एप्रिलपासून निर्यात कशी राहील, हे सांगता येत नाही. त्यामुळे दरावर दबाव असल्याचे निर्यातदारांनी सांगितले.

पण यंदा देशातून २० लाख टनांच्या दरम्यान सोयापेंड निर्यात होऊ शकते, त्यामुळे सोयाबीन दरवाढ अपेक्षितच आहे, असे सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितले. मार्च महिन्यापर्यंत शेतकऱ्यांनीही सोयाबीनची मर्यादीत विक्री केली. पण उद्योगांना गरजेपुरता माल मिळत गेला.

मार्च महिन्यात जास्त निर्यातीचे सौदे झाले. त्यामुळं सोयाबीनला मागणी आहे. पण नेमकं याच काळात शेतकऱ्यांचं पॅनिक सेलिंगही दिसत आहे. त्यामुळे बाजारात आवक वाढली. परिणामी दरवाढ दिसत नाही.

मार्च महिन्यात गरज असलेले शेतकरी सोयाबीन विकत आहेत. चालू महिन्यात आवकही जास्त राहील. पण एप्रिलमध्ये आवकेचा दबाव आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

Soybean Market
Soybean Rate : आज १० मार्चला सोयाबीनला सर्वाधिक दर कोणत्या बाजारात मिळाला?

कारण आर्थिक नड असलेल्या शेतकऱ्यांचं सोयाबीन एकदा बाजारात येऊन गेल्यानंतर आर्थिक क्षमता असलेलेच शेतकरी सोयाबीन ठेवतील. त्यामुळे हे शेतकरी त्यांना अपेक्षित दर होईपर्यंत वाट पाहतील. त्यामुळे दर सुधारणा अपेक्षित आहे.

शेतकऱ्यांनी मार्च महिन्यापर्यंत सोयाबीन ठेवले. पण मार्च महिन्यातील दबावात सोयाबीनची आवकही येत आहे. मार्च महिन्यात सोयाबीनची आवक वाढेल, याचा अंदाज व्यापारी आणि उद्योगांनाही होताच.

तसचं घडत असल्याने दरात सुधारणा दिसत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पॅनिक सेलिंग टाळावे. सोयाबीनला किमान ५ हजार ५०० रुपयांचे टार्गेट ठेवण्यास हरकत नाही. त्यामुळे सोयाबीनची टप्प्याटप्प्याने विक्री करावी, असे आवाहन सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com