Soybean Market : सोयाबीन दर वाढले; काय झाली दरपातळी?

गेल्या हंगामात याच काळात शेतकऱ्यांनी केवळ ४८ लाख टन सोयाबीनची विक्री केली होती. म्हणजेच बाजारातील आवक जवळपास ३० टक्क्यांनी जास्त राहीली.
Soybean
SoybeanAgrowon
पुणेः देशात दोन दिवसांपासून सोयाबीन दरात (Soybean Rate) काहीशी उचल घेतली. अनेक बाजारात दर सुधारले आहेत. आज सोयाबीनची दरपातळी ५ हजार १०० ते ५ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान होती.
सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपानं देशातील सोयापेंड (Soya meal) वापर आणि निर्यात वाढल्याचे स्पष्ट केले. यामुळे सोयाबीन दराला आधार मिळू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

सोपाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, देशातील सोयाबीन हंगाम (Soybean Season) सुरु होऊन चार महिने पूर्ण झाले. ऑक्टोबर ते डिसेंबर या चार महिन्यांच्या काळात शेतकऱ्यांनी ६१ लाख टन सोयाबीन विकलं. तर जळपास ८७ लाख टन सोयाबीन शेतकरी, व्यापारी आणि स्टाॅकीस्ट यांच्याकडे असल्याचं सोपानं म्हटलंय.

गेल्या हंगामात याच काळात शेतकऱ्यांनी केवळ ४८ लाख टन सोयाबीनची विक्री केली होती. म्हणजेच बाजारातील आवक जवळपास ३० टक्क्यांनी जास्त राहीली.

बाजारात आलेल्या सोयाबीनपैकी ४३ लाख ५० हजार टनांचं गाळप झालं. मागील हंगामात याच काळातील गाळप २८ लाख ५० हजार टन झालं होतं, असंही सोपानं म्हटलंय.

Soybean
Soybean Market: आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयापेंड तेजीतच | Agrowon | ॲग्रोवन

यंदा सोयाबीन गाळप वाढल्यानं सोयापेंड निर्मितीही वाढली. चालू हंगामात पहिल्या चार महिन्यांमध्ये ३४ लाख ९४ हजार टन सोयापेंड निर्मिती झाली. तर मागील हंगामात याच काळात २२ लाख ७५ हजार टन सोयापेंड मिळाली होती, असंही सोपानं सांगितलं.

यंदा सोयापेंड उत्पादन वाढीचा अंदाज आहे. त्यामुळं सोयाबीनचे दर सोयापेंड निर्यात आणि वापरावरच टिकून राहील, असं सांगितलं जात होतं.

देशातील सोयापेंड वापरही वाढला

देशातील सोयापेंडचा वापरही वाढल्याचं सोपानं सांगितलं. यंदा पहिल्या चार महिन्यांमध्ये देशात २८ लाख टन सोयापेंडचा वापर झाला.

मागील हंगामातील याच काळात देशांतर्गत सोयापेंडचा वापर २४ लाख २० हजार टनांवर होता. म्हणजेच यंदा ३ लाख ७० हजार टनाने देशातील सोयापेंड वापर वाढला. 

सोयापेंड निर्यात वाढली

यंदा देशातून सोयापेंड निर्यातही वाढल्याचं सोपानं स्पष्ट केलं. सोपाच्या मते ऑक्टोबर ते जानेवारी या चार महिन्यांमध्ये देशातून ६ लाख ३१ हजार टन सोयापेंड निर्यात झाली.

तर मागील हंगामात याच काळातील निर्यात ३ लाख ८३ हजार टनांवर होती. म्हणजेच यंदा सोयापेंड निर्यात जवळपास अडीच लाख टनाने अर्थात तब्बल ६५ टक्क्याने अधिक आहे. 

निर्यातवाढीचा दराला आधार

देशातून सोयापेंड निर्यात वाढल्याचंही सोपानं स्पष्ट केलंय. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडचे दर तेजीत आहेत. त्यामुळे भारतीय सोयापेंडलाही मागणी वाढली. निर्यात वाढल्यानं देशातील बाजारात सोयाबीन दरात सुधारणा पाहायला मिळत आहे.

दरवाढ कायम राहील

सोयाबीनच्या दरात मागील तीन दिवसांमध्ये ३०० ते ४०० रुपयांपर्यंत सुधारणा झाली. आज देशातील बाजारात सोयाबीनला सरासरी ५ हजार १०० ते ५ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान दर मिळाला. देशातून सोयापेंड निर्यातीचा वेग कायम राहण्याचा अंदाज आहे.

तर आंतरराष्ट्रीय बाजारातही दर टिकून आहेत. त्यामुळं देशातील दरवाढ कायम रहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com