Soybean Market: आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात नरमाई

Soybean Rate : देशातील बाजारात सध्या सोयाबीनचे भाव स्थिर आहेत. सोयाबीनला मागील दोन महिन्यांपासून हा भाव मिळत आहे.
Soybean Market News
Soybean Market NewsAgrowon

Soybean Bajarbhav : देशातील बाजारात सध्या सोयाबीनचे भाव स्थिर आहेत. सोयाबीनला मागील दोन महिन्यांपासून हा भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा मोठा हिरमोड झाला. सध्या अनेक शेतकऱ्यांकडे सोयाबीन स्टाॅक आहे. हे शेतकरी दरवाढीची वाट पाहत आहेत. मात्र बाजारात त्यांना अपेक्षित दरपातळी दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला.

गेल्या हंगामात सोयाबीनला चांगला भाव मिळाला होता. मार्चनंतर सोयाबीनच्या दरात वाढ होत गेली. मार्चनंतरच्या काळात सोयाबीनला सरासरी ७ हजारांचा भाव मिळाला होता. यंदाही सोयाबीनला याच दरम्यान भाव मिळेल, अशी आशा होती.

त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची टप्प्याटप्प्याने विक्री सुरु केली. सोयाबीन आवकेचा दबाव बाजारावर येऊ दिला नव्हता. पण मार्चमध्ये सोयाबीन दराने ५ हजारांचा टप्पा गाठला होता. तेव्हापासून दरात काहीसे चढ उतार झाले. पण वाढलेल्या पातळीवर दर टिकले नाहीत.

Soybean Market News
Soybean Village Seed Production : हिंगोलीत अडीच लाख हेक्टरवर सोयाबीन ग्रामबीजोत्पादनाचे नियोजन

भारताच्या सोयाबीनचे दर सोयापेंड निर्यातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात. यंदा निर्यातही चांगली झाली. पण मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव कमी होऊन सोयापेंड स्वस्त झाले. त्यामुळे यापुढील काळात सोयापेंड निर्यातीला फारसा वाव नसल्याचे निर्यातदार सांगत आहेत.

यंदा महत्वाच्या सोयापेंड निर्यातदार अर्जेंटीनात सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली. पण ब्राझीलमध्ये उत्पादन वाढले. ब्राझीलच्या उत्पादनाने अर्जेंटीनातील उत्पादन घटीने निर्माण झालेली पोकळी भरून काढली.

आता ब्राझीलमधील सोयाबीन काढणी ९६ टक्क्यांवर पोचली. ब्राझीलचे उत्पादन यंदा १ हजार ५३० लाख टनांवर पोचण्याचा अंदाज आहे. काढणीही आता पूर्ण होत असल्याने बाजारात पुरवठा वाढला. ब्राझीलमधून मोठ्या प्रमाणात सोयाबीन आंतरराष्ट्रीय बाजारात येत आहे.

चीन सध्या ब्राझीलच्या सोयाबीनचा सर्वात मोठा खरेदीदार ठरत आहे. ब्राझीलच्या सोयाबीनचा आंतरराष्ट्रीय बाजारावर परिणाम जाणवत आहे. ब्राझीलचे सोयाबीन बाजारात आल्यानंतर दरात नरमाई आली होती.

अमेरिकेत यंदा पाऊसमान चांगले राहण्याचा अंंदाज आहे. गेल्या हंगामात अमेरिकेत अनेक भागात पाऊस कमी झाला होता. याचा परिणाम सोयाबीन उत्पादनावर झाला होता.

Soybean Market News
Soybean Variety Selection : सोयाबीनचे नविन वाण निवडताना काय काळजी घ्यावी?

अमेरिकेचे उत्पादन कमी झाले होते. पण यंदा अमेरिकेत सोयाबीन पेरणी वाढण्याचा अंदाज आहे. तसा अहवाल अमेरिकेच्या कृषी विभागाने जाहीर केला. अमेरिकेत सोयाबीन पेरणी वाढण्याचा अंदाज असल्याचाही परिणाम बाजारावर जाणवत आहे, असे जाणकारांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडचे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे भारतातून सोयापेंड निर्यात पुढील काळात कमी होऊ शकते. त्यामुळे सोयापेंडचे दर देशातील मागणीवरच अवलंबून असतील. सध्याचा सोयापेंडचा भाव टिकून राहू शकतो.

तर पुढील काळात दरात काहीसे चढ उतार दिसू शकतात. सोयाबीनचे भावही टिकून राहतील. सोयाबीनला ५ हजारांचा बेस आहे. दरात काही काळ मर्यादीत तेजीही दिसू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com