Soybean : अमेरिकेत सोयाबीन उत्पादन घटणार

आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर नरमले. त्यामुळे सोयाबीन दरही कमी झाले. या परिस्थितीत अमेरिकेत सोयाबीन उत्पादन कसे राहील, यावर जगाचे लक्ष होते.
Soybean Sowing
Soybean SowingAgrowon

पुणेः आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर (International Market Edible Oil Rate) नरमले. त्यामुळे सोयाबीन दरही कमी झाले. या परिस्थितीत अमेरिकेत सोयाबीन उत्पादन (Soybean Production In America) कसे राहील, यावर जगाचे लक्ष होते. आता अमेरिकेच्या कृषी विभागाने (Unitest States Department Of Agriculture) आपल्या अहवालात अमेरिकेत सोयाबीन पेरणी (Soybean Sowing) कमी झाल्याचे म्हटले. तर जागतिक तेलबिया उत्पादनात घट (Oil Seed Production) होणार असल्याचा अंदाज जाहिर केला. पण या अहवालात सोयाबीन बाजाराबाबत नेमकं काय म्हटले? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.

Soybean Sowing
अतिवृष्टीमध्ये सोयाबीन पिकाची काय काळजी घ्याल ?

जगात अमेरिका, ब्राझील, अर्जेंटीना, कॅनडा, पेरुग्वे आणि उरुग्वे हे महत्वाचे सोयाबीन उत्पादक आणि निर्यातदार देश आहेत. या देशांचा जागतिक उत्पादन आणि निर्यातीत ८५ टक्क्यांपेक्षा अधिक वाटा असतो. तर २०१९ पर्यंत अमेरिका सोयाबीन उत्पादनात आघडीवर होती. परंतु नंतरच्या काळात ब्राझीलमध्ये उत्पादनात मोठी वाढ झाली. ब्राझीलमध्ये सोयाबीन पिकाला पोषक स्थिती, जमिनीची सुपिकता, हवामान आणि पाण्याची उपलब्धता, यामुळे उत्पादन वाढले.

Soybean Sowing
In Heavy Rain सोयाबीन पिकाची काय Care घ्याल ?|Soybean |Agrowon | ॲग्रोवन

अमेरिकेत यंदा सोयाबीन पेरा घटला. यंदा अमेरिकेतील पेरणी क्षेत्र ८७५ लाख हेक्टरपर्यंत स्थिरावलं. त्यामुळे सोयाबीन उत्पादनात घट होण्याची शक्यता अमेरिकेच्या कृषी विभागाने व्यक्त केली. उत्पादनच कमी होणार असल्यानं अमेरिकेची निर्यातही घटण्याचा अंदाज आहे. तर सोयाबीन उत्पादकता कमी राहील. त्यामुळे उत्पादन गेल्यावर्षीच्या तुलनेत ४५ लाख बुशेल्सने घटेल. एक बुशेल म्हणजेच २७.२२ किलो सोयाबीन. अमेरिकेत सुरुवातीला यंदा उत्पादन वाढीची शक्यता होती. मात्र सुरुवातीच्या अंदाजात आता १३५० लाख बुशेल्सने कपात करण्यात आली. म्हणजेच यंदा अमेरिकेत १२२६ लाख टन उत्पादन होईल.

अमेरिकेतील एकूण तेलबिया उत्पादन २०२२-२३ मध्ये १३२७ लाख टनांवर स्थिरावण्याची शक्यता आहे. म्हणजेच यात सोयाबीनचा वाटा सर्वाधिक राहील. तरीही हे तेलबिया उत्पादन मागील दोन वर्षांतील उच्चांकी असेल. अमेरिकेत सोयाबीन, कॅनोला, शेंगदाणा आणि सरकी उत्पादनात यंदा घट होणार आहे. त्यामुळे सहाजिकच तेलबिया उत्पादन घटेल. मात्र येथे सूर्यफुल उत्पादनात काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील हंगामात अमेरिकेत सोयाबीनचा सर्वसाधारण दर १४.४० डाॅलर प्रतिबुशेल्स राहण्याचा अंदाज आहे. तर जागतिक तेलबिया उत्पादन कमी राहील. तर निर्यातही घटेल मात्र तेलबियागाळप वाढेल आणि शिल्लक साठा घटेल, असा अंदाज युएसडीएने व्यक्त केलाय.

जगात सोयाबीनला दरवर्षी मागणी वाढत आहे. पामतेलाचा वापर जैवइंधनामध्ये जास्त होतो. त्यामुळं खाण्यासाठी सोयाबीन तेलाला पसंती वाढली. जाणकारांच्या मते २०२२ ते २०२७ या काळात जागतिक सोयाबीन मार्केट वार्षिक ३.५ टक्क्याने वाढेल. जगात सोयाबीनपासून निर्मित केलेल्या उप पदर्थांनाही मागणी वाढत आहे. याचा परिणाम सोयाबीन बाजारावर दिसत आहे. तसेच कोरोनानंतर लोकांची वनस्पतीपासून निर्मित प्रोटीन पदार्थांना मागणी वाढली. तसेच वाढती शाकाहारी लोकसंख्या आणि आरोग्याबाबत जागरुकता यामुळे सोयाबीन पदार्थांचा वापर वाढतोय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com