कांदा अनुदानासाठी राज्याचा केंद्राकडे प्रस्तावच नाही

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार यांची सरकारवर टीका
कांदा अनुदानासाठी राज्याचा केंद्राकडे प्रस्तावच नाही
Onion Agrowon

देवळा, जि. नाशिक : शेतकऱ्यांच्या कांदा पिकासाठी अनुदान (Onion Subsidy) म्हणून केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे. असे असतानादेखील नाकर्त्या राज्य सरकारने अद्याप केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवला नसल्याकारणाने अनुदान अद्याप देऊ शकत नाही. याचा निषेध करत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी राज्य सरकारवर टीका केली.

देवळा येथील सेवा, सुशासन, गरीब कल्याण संमेलनप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी चांदवड-देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर होते. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष केदार आहेर, माजी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, भाजपचे संघटनमंत्री रवी अनासपुरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन दराडे, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दत्तराज छाजेड, नितीन पांडे, नंदकुमार खैरनार, तरंग गुजराथी, कळवणचे तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, नाशिक तालुकाध्यक्ष नितीन गायकर, दिंडोरी तालुकाध्यक्ष नरेंद्र जाधव, नांदगाव तालुकाध्यक्ष गणेश शिंदे, दिशांत देवरे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दादा जाधव, विकास देशमुख, चांदवडचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, देवळा नगराध्यक्षा भारती आहेर, उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर आदी उपस्थित होते.

डॉ. पवार म्हणाल्या की, राज्यात भाजप सरकार होते, तेव्हा कांद्याचे भाव पडले असताना शेतकऱ्यांच्या पदरी काही पडावे या हेतुने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत १०० रुपये प्रत्येकी केंद्र सरकार व राज्य सरकार अनुदान जाहीर होत अंमलबजावणी झाली होती. तशीच परिस्थिती आता असताना राज्य शासन केंद्र सरकारच्या नावाने खडे फोडत आहे. मात्र या मागची सत्यता ते लपवीत असून आम्ही केंद्राकडे मागणी करून अगोदरच अनुदान देण्याचा प्रस्ताव मान्य करून ठेवला असून राज्य सरकारने या संबंधीचा प्रस्ताव त्वरित दाखल करावा व शेतकरी उत्पादकांना त्याचा मोबदला त्वरित मिळवून द्यावा, असे स्पष्ट सांगितले. कांदा निर्यात सुरू असतानादेखील विरोधक केंद्राच्या नावाने बदनामी करीत आहेत. शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com