मसाला निर्यातवाढ अबाधित राखा : पियुष गोयल

कीटकनाशकांशी संबंधित समस्येमुळे गेल्या काही वर्षांत भारताकडून युरोपियन युनियनमध्ये होणारी मसाल्यांची निर्यात बंद झाली असल्याची व्यथा ऑल इंडिया स्पाईसेस एक्सपोर्टर्स फोरमचे अध्यक्ष चेरियन झेव्हियर यांनी मांडली.
मसाला निर्यातवाढ अबाधित राखा  : पियुष गोयल
spices exportAgrowon

जगात सध्या खाद्य सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे उत्पादनांच्या गुणवत्तेचा आग्रह धरला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीची कास धरायला हवी. नैसर्गिक शेती पद्धतीमधील क्षमता लक्षात घेऊन त्या पद्धतीचा अंगीकार करण्याची गरज आहे, असे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले.

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी मसाला निर्यातदारांशी संवाद साधला. यावेळी गोयल यांनी मसाला उद्योग क्षेत्रातील वाढ कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

spices export
कोचीन आणि इतर बंदरावरूनही पामतेल आयात सुरु करण्याची मागणी

गोयल यांनी मसाला उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींना उत्पादनांची उच्चतम गुणवत्ता, प्रक्रिया आणि मूल्यवृद्धी अबाधित राखण्याचे आवाहन केले. यामुळे जगभरात भारतीय उत्पादनांची वेगळी ओळख निर्माण होईल, तसेच देशातील मसाला उत्पादकांना चांगला दरही मिळेल, असा विश्वास मंत्री गोयल यांनी व्यक्त केला.

तत्पूर्वी मसाला निर्यातदारांनी निर्यात प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या अडचणी मंत्री गोयल यांच्यासमोर मांडल्या. कीटकनाशकांशी संबंधित समस्येमुळे गेल्या काही वर्षांत भारताकडून युरोपियन युनियनमध्ये होणारी मसाल्यांची निर्यात बंद झाली असल्याची व्यथा ऑल इंडिया स्पाईसेस एक्सपोर्टर्स फोरमचे अध्यक्ष चेरियन झेव्हियर यांनी मांडली. याप्रकरणी केंद्र सरकारच्या तत्काळ मध्यस्थीची अपेक्षा व्यक्त केली.

इतर मसाला आयातदार देशांकडूनही आता इथिलिन ऑक्साईड रेसिड्यू चाचणीची (ETO) मागणी करण्यात येत आहे. यासंदर्भात युरोपियन युनियनने ठरवलेल्या निकषांचा आग्रह या सर्व देशांकडून धरला जात आहे. यासंदर्भातही सरकारने पुढाकार घेऊन इथिलिन ऑक्साईडच्या अवशेषांबाबतचे नियम शिथिल करायला हवेत, असेही झेव्हियर यांनी म्हटले.

कंटेनर्सच्या वाढत्या किमती, युद्धामुळे वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळेही निर्यातदारांना निर्यात परवडत नसल्याचा मुद्दा यावेळी गोयल यांच्यासमोर उपस्थित करण्यात आला. मसाला निर्यातीतून मिळणाऱ्या नफ्याचे घटते प्रमाण लक्षात घेऊन सरकारने वाहतुकीसाठी आर्थिक मदत करायला हवी, अशी मागणी करण्यात आली.

मसाला निर्यातदारांना निर्यात प्रक्रियेदरम्यान सध्या विविध यंत्रणांकडे जावे लागते, ही प्रक्रिया खर्चिक आणि वेळखाऊ आहे, त्यामुळे केंद्र सरकारने निर्यातीशी संबंधित सर्व प्रक्रियांसाठी सिंगल विंडो सिस्टीम उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही ऑल इंडिया स्पाईसेस एक्सपोर्टर फोरमतर्फे करण्यात आली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com