साखर उत्पादनात ओलांडला ३५० लाख टनांचा टप्पा

साखर उत्पादनात ओलांडला ३५० लाख टनांचा टप्पा
Sugar ExportAgrowon

कोल्हापूर : देशात ६ जून अखेर २९ कारखाने अद्यापही सुरू आहेत. देशाने ३५० लाख टनाचा साखर उत्पादनाचा (Sugar Production) टप्पा ओलांडला आहे. यंदा ५२२ साखर कारखान्यांनी हंगाम (Sugar Season) सुरू केला होता. गेल्या वर्षी याच कालावधीअखेर ३०७ लाख टन साखरेचे उत्पादन (Record Sugar Production) झाले होते. या कालावधीत यंदा ३५२ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षीपेक्षा ४५ लाख टन साखरेचे उत्पादन जादा (Excess Sugar Production) झाले आहे.

गेल्या वर्षी याच कालावधीत देशातील केवळ ४ साखर कारखाने सुरू होते. सध्या सुरू असणाऱ्या कारखान्यांमधील सुमारे ९० टक्के कारखाने हे फक्त एकट्या महाराष्ट्रातील आहेत. ३० सप्टेंबरअखेर आणखी सुमारे ६ लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. यंदाचे साखर उत्पादन ३६० लाख टनापर्यंत जाईल, असा सुधारित अंदाज ‘इस्मा’चा आहे. गेल्यावर्षी इथेनॉलकडे २० लाख टन साखर वळूनही ३११ लाख टन उत्पादन झाले होते. यंदा ३४ लाख टन साखर इथेनॉलसाठी वापरून ही ३६० लाख टनांपर्यंत साखर उत्पादन जाईल, असा अंदाज आहे

सहा जूनअखेर देशातील साखर कारखान्यांनी ‘इस्मा’ला दिलेल्या अहवालानुसार, एप्रिलअखेरची साखर विक्री १६० लाख टन इतकी आहे. ती गेल्या वर्षी याच कालावधीत १५२ लाख टन होती. यंदा ७.५ लाख टनांनी देशांतर्गत विक्री वाढली आहे. यावर्षी जूनअखेर साखर कारखान्यांना दिलेला विक्री कोटा या वर्षीच्या जूनच्या तुलनेत ५.५ लाख टनांनी जादा आहे. याचा विचार केल्यास यंदाचा साखरेचा खप २७५ लाख टन इतका असेल.

६७ लाख टन साखर शिल्लक राहण्याचा अंदाज
गेल्या वर्षी कारखान्यांनी २६५ लाख टन साखर देशांतर्गंत बाजारात विकली होती. १ ऑक्टोंबर २०२१ अखेर ८२ लाख टनांचा प्रारंभिक साठा होता. २७५ लाख टन स्थानिक विक्री, १०० लाख टन निर्यात आणि ३६० लाख टन साखरेचे उत्पादन हे समीकरण लक्षात घेता ३० सप्टेंबर २०२२ अखेर ६७ लाख टन साखर शिल्लक राहील, असा अंदाज आहे. पुढच्या तीन महिन्यांसाठी ही साखर पुरेशी असेल. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने नुकतीच साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. यामध्ये हा अंदाज व्यक्त करण्यात आला.

उपग्रहाद्वारे घेणार ऊस उपलब्धतेचा अंदाज
जून २०२२ च्या उत्तरार्धात उपग्रह प्रतिमांच्या आधारे पुढील वर्षी किती ऊस तोडणीसाठी उपलब्ध होईल, या बाबतचा अंदाज घेण्यात येणार आहे. प्रतिमा उपलब्ध झाल्यास पुन्हा साखर उद्योगातील प्रमुख व्यक्ती, संस्थांची बैठक ‘इस्मा’च्या वतीने घेण्यात येईल. पुढील हंगामासाठीचा आराखडा तयार करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com