
कोल्हापूर : प्रत्येक वर्षी देशात साखरेच्या उत्पादनात (Sugar Production) उच्चांकी असणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये येणाऱ्या हंगामातही गेल्या वर्षीपेक्षा चार टक्क्यांनी उसाचे क्षेत्र (Sugarcane Acreage) वाढणार आहे. या वर्षाच्या तुलनेत यंदा ८० हजार हेक्टर क्षेत्राची वाढ झाली आहे.
गेल्या वर्षीचा अपवाद वगळता उत्तर प्रदेश सातत्याने ऊस व साखर उत्पादनात देशात अग्रक्रमावर आहे. उसाला चांगली किंमत मिळत असल्याने उत्तर प्रदेशातील शेतकरीही ऊसाकडे सातत्याने वळत असल्याचे चित्र आहे. गहू, भात व अन्य पारंपरिक पिकाऐवजी शेतकरी उसाला प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदा गाळपात ही वाढ होण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी २०२१-२२ उत्तर प्रदेशात २.८४ लाख हेक्टर क्षेत्रावर उसाचे पीक होते. यंदा २.९३ लाख हेक्टर क्षेत्रावर उसाचे पीक असल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारची आहे. २०२०-२१ मध्ये उसाचे क्षेत्र २.७६ लाख हेक्टर इतके होते. २०१९-२० मध्ये २.७४ लाख हेक्टर होते. गेल्या तीन वर्षांचा आढावा घेतला तर सातत्याने उसाच्या क्षेत्रात वाढत होत असल्याचे चित्र आहे.
राज्यातील शेतकरी गहू व भाताचे उत्पादन घेतात पण गेल्या हंगामामध्ये साखर कारखान्यांनी उच उत्पादकांना वेळेवर रक्कम देण्याचे धोरण अवलंबले यामुळे शेतकरी ऊसाकडे आकर्षित होत असल्याची माहिती उत्तर प्रदेशच्या साखर उद्योगातील सूत्रानी दिली. पावसाचे कमी जास्त प्रमाण झाले तरी गहू व भाता इतके नुकसान होत नसल्याने शेतकरी उसाकडे वळत आहे.
उत्तर प्रदेश सरकारकडून जादा उत्पन्न देणाऱ्या ऊस जातींची सहज उपलब्धता करून देण्यात येत आहे. या ऊस जाती तयार करण्यासाठी महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. याचबरोबर ऊस उत्पादनासाठी लागणाऱ्या निविष्ठा, खते किटकनाशके सहज सोप्या पद्धतीने पुरवण्यात येत असल्याने ऊस उत्पादकांकडून ऊस लागवडीला पसंती मिळत असल्याचे ऊस उद्योगातील सूत्रानी सांगितले.
७४०० कोटींची बिले थकीत
यंदा उत्तर प्रदेशातील उसाचा हंगाम वेळेत म्हणजे ऑक्टोबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. या दृष्टिने साखर कारखानदार तयारीला लागले आहेत. उत्तर प्रदेशातील साखर कारखानदार निर्यातीपेक्षा स्थानिक विक्रीला अधिक प्राधान्य देतात. यंदा ऊस क्षेत्र जास्त असल्याने साखरेचे उत्पादन ही वाढणार आहे. बहुतांश कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीलाही प्राधान्य दिले आहे. या दृष्टिने प्रकल्पाची उभारणी व नूतनीकरण सुरू असल्याची माहिती साखर कारखाना सूत्रांनी दिली. जुलैच्या पहिल्या आठवड्याअखेर राज्यात २७ हजार ७८० कोटी रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. अजूनही ७४०० कोटी रुपयांची बिले थकीत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.