Soybean, Maize Crop Update : उन्हाळी भुईमूग व मका रोप अवस्थेत, तर सोयाबीन फुलोऱ्यात

लातूर विभागातील पाचही जिल्ह्यांत पेरणी झालेले उन्हाळी भुईमूग व मका पीक रोप अवस्थेत आहे. दुसरीकडे सोयाबीनच फुलोऱ्याच्या अवस्थेत असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
Soybean Maize
Soybean MaizeAgrowon

Latur News : लातूर विभागातील पाचही जिल्ह्यांत पेरणी झालेले उन्हाळी भुईमूग व मका पीक रोप अवस्थेत आहे. दुसरीकडे सोयाबीनच फुलोऱ्याच्या अवस्थेत असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

लातूर विभागात मागील सप्ताहात हवामान उष्ण व कोरडे होते. लातूर विभागातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान 813.38 मिलिमीटर असून दिनांक 31 डिसेंबर 2022 पर्यन्त 935.98 मिलिमीटर इतका पाऊस झाला होता. तो 31 ऑक्टोबरच्या सरासरीच्या 115 टक्के असून, वार्षिक सरासरीच्या 115 टक्के इतका होता.

लातूर विभागातील खरीप हंगामातील सरासरी क्षेत्र 27 लाख 66 हजार 954 हेक्टर असून, 27 लाख 62 हजार 489 हेक्टर क्षेत्रावर 100 टक्के प्रत्यक्ष पेरणी झाली होती.

लातूर कृषी विभागातील लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड या पाचही जिल्ह्यांत उन्हाळी हंगामाचे सरासरी क्षेत्र 71 हजार 700 हेक्टर असून, 32 हजार 388 हेक्टर म्हणजे सरासरीच्या 45 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

Soybean Maize
Maize, Chana Market Update : मक्याच्या दरात घट; हरभरा स्थिर

रब्बी पीक स्थिती

लातूर विभागातील रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्र 13 लाख 63 हजार 931 हेक्टर होते. प्रत्यक्षात 16 लाख 71 हजार 682 हेक्टर क्षेत्रावर म्हणजे सरासरीच्या 123 टक्के क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झाली होती. विभागात रब्बी ज्वारी पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र 3 लाख 71 हजार 857 हेक्टर होते.

त्या तुलनेत 2 लाख 97 हजार 907 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्याची टक्केवारी 80 टक्के होती. पीक सद्या काढणी अवस्थेत असून, 90 ते 95 टक्के काढणी पूर्ण झालेली आहे.

रब्बी गहू पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र 1 लाख 56 हजार 519 हेक्टर होते. त्या तुलनेत 1 लाख 54 हजार 216 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्याची टक्केवारी 99 टक्के आहे. 100 टक्के काढणी पूर्ण झालेली आहे.

हरभरा पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र 7 लाख 86 हजार 124 हेक्टर, तर प्रत्यक्षात 11 लाख 59 हजार 839 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. त्याची टक्केवारी 148 टक्के आहे. पीक सध्या काढणी अवस्थेत असून 100 टक्के काढणी पूर्ण झालेली आहे.

Soybean Maize
Crop Advice : द्राक्ष, भाजीपाला, कांदा, वांगी पिकांचा पीक सल्ला

रब्बी मका : पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र 17 हजार 971 हेक्टर तर प्रत्यक्षात 17 हजार 764 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्याची टक्केवारी 99 टक्के होती. मका पीक सध्या कणसे पक्व होण्याच्या अवस्थेत आहे.

करडई : पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र 19 हजार 531 हेक्टर, तर प्रत्यक्षात 23 हजार 948 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. त्याची टक्केवारी 123 टक्के आहे. पिकाची 100 टक्के काढणी पूर्ण झाली आहे.

उन्हाळी पीक परिस्थिती...

उन्हाळी सोयाबीन : पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र 16 हजार 156 हेक्टर असून, प्रत्यक्षात 9 हजार 850 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्याची टक्केवारी 61 टक्के आहे. पीक सध्या फुलोरा अवस्थेत आहे.

उन्हाळी भुईमूग : पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र 26 हजार 388 हेक्टर असून, प्रत्यक्षात 11 हजार 713 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्याची टक्केवारी 44 टक्के आहे. पीक सध्या रोप अवस्थेत आहे.

उन्हाळी मका : पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र 8 हजार 057 हेक्टर असून, प्रत्यक्षात 3 हजार 379 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्याची टक्केवारी 42 टक्के आहे. पीक सध्या रोप अवस्थेत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com