भातपिकाच्या खरेदीसाठी तेलंगणाने घेतले १५ हजार कोटींचे कर्ज!

राज्यातील रब्बी हंगामातील भातपिकाच्या खरेदीसाठी (Paddy Procurement) तेलंगणा सरकारने १५ हजार कोटी रुपयांचे कर्ज उचलले आहे. रब्बी हंगातल्या भातपिकाच्या खरेदीसाठी राज्यभरात ५ हजार खरेदी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Paddy Procurement
Paddy Procurement Agrowon

राज्यातील रब्बी हंगामातील भातपिकाच्या खरेदीसाठी (Paddy Procurement) तेलंगणा सरकारने १५ हजार कोटी रुपयांचे कर्ज उचलले आहे. रब्बी हंगामातील भातपिकाची हमीभावाने (MSP) खरेदी करता यावी यासाठी राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा महामंडळाने ४ बँकाकडून हे कर्ज घेतले आहे.

रब्बी हंगातल्या भातपिकाच्या खरेदीसाठी राज्यभरात ५ हजार खरेदी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या शुक्रवारपासून (दिनांक २२ एप्रिल) गावागावात खरेदी प्रक्रिया सुरु होणार असल्याचे तेलंगणाचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री जी. कमलाकर यांनी सांगितले आहे.

Paddy Procurement
तेलंगणातल्या तांदूळ उत्पादकांना अखेर दिलासा!

भातपिकाचे उत्पादन आणि मागणीनुसार १० मेच्या सुमारास खरेदी केंद्रांची संख्या ७ हजारांवर नेण्याचे सरकारचे नियोजन आहे. १५ जूनपर्यंत या खरेदी केंद्रांवर भातपिकाची हमीभावाने (MSP) खरेदी करण्यात येणार असल्याचे कमलाकर यांनी म्हटले आहे.

भातपिकाची खरेदी केल्यानंतर आठवडाभरात संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यांत पैसे जमा करण्यात येणार आहेत. भातपिकासाठी १९६० रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव (MSP) जाहीर झालेला आहे.

Paddy Procurement
शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ नको; के.चंद्रशेखर राव

या रब्बी हंगामात राज्य सरकारकडून ६५ लाख टन भातपिकाची खरेदी करण्यात येणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात धान्याची साठवणूक कशी करणार?, हा राज्य सरकारासमोरील पेच असल्याचे कमलाकर म्हणाले आहेत.

फूड कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या (FCI) गोदामात खरिपात खरेदी केलेले धान्य शिल्लक आहे. गेल्यावर्षी कोरोना महामारीमुळे सरकारी शाळा- महाविद्यालये, खाजगी मंगल कार्यालयांत धान्याची साठवणूक करण्यात आली. मात्र यावर्षी शाळा-महाविद्यालये सुरु झाली आहेत, मंगल कार्यालयेही सुरु झाली आहेत, त्यामुळे साठवणुकीचा प्रश्न निर्माण झाल्याचेही कमलाकर यांनी नमूद केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com