Textile Export : देशातून तयार कापडे निर्यात वाढली

देशातून कापडे निर्यात चालू आर्थिक वर्षातील पहिल्या १० महिन्यांमध्ये ५.२२ टक्क्यांनी वाढली.
Textile Export
Textile ExportAgrowon

Pune News : जगात कापूस उत्पादनात (Cotton production) भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र तयार कापड आणि सूत निर्यातीत भारताचा वाटा कमी आहे.

चालू आर्थिक वर्षातील १० महिन्यांमध्ये देशातून होणारी तयार कापडे निर्यात ५.२२ टक्क्यांनी वाढली. मात्र सूत, कापड आणि हातमाग उत्पादनांची निर्यात तब्बल २८ टक्क्यांनी घटली आहे.

देशातून कापडे निर्यात चालू आर्थिक वर्षातील पहिल्या १० महिन्यांमध्ये ५.२२ टक्क्यांनी वाढली. २०२२-२३ च्या आर्थिक वर्षात एप्रिल ते जानेवारी या काळात १ हजार ३३३ कोटी डाॅलर किमतीचे तयार कापडे निर्यात केले.

मागील हंगामात १ हजार २६७ कोटींची निर्यात झाली होती, अशी माहिती वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

Textile Export
Cotton Market: कापूस उत्पादन घट, निर्यातीमुळे बाजाराला आधार| Agrowon| ॲग्रोवन

कापूस सूत, कापड आणि हातमाग उत्पादनांची निर्यात मात्र २८ टक्क्यांनी कमी होऊन ९०४ कोटींवर घसरली. मागीलवर्षी कापूस सूत, कापड आणि हातमाग उत्पादनांची निर्यात १ हजार २६९ कोटींवर होती.

कार्पेट निर्यातही २३ टक्क्यांनी घटली असून ११५ कोटींवर कमी झाली. मानवनिर्मित सूत, कापडाची निर्यातही ११ टक्क्यांनी कमी राहीली. यंदाच्या १० महिन्यांमध्ये ही निर्यात ४०७ कोटींवर झाली होती.

जानेवारीतील निर्यात कमी

जानेवारी महिन्याचा विचार करता तयार कपड्यांची निर्यात ३ टक्क्यांनी कमी राहिली. जानेवारी २०२३ मध्ये १४९ कोटी डाॅलरपर्यंतच झाली.

मागील हंगामात याच काळातील निर्यात १५४ कोटी डाॅलर झाली होती. तर जानेवारीतील कापूस सूत, कापड आणि हातमाग उत्पादनांची निर्यात तब्बल ३७ टक्क्यांनी कमी होती. जानेवारीत केवळ ८७ कोटी डाॅलरची निर्यात झाली.

निर्यात वाढण्याची शक्यता

देशात नोव्हेंबर महिन्यात कापसाचे भाव जास्त होते. मात्र डिसेंबरच्या मध्यापासून दरात मोठी घसरण झाली. जानेवारी आणि फेब्रुवारीच्या मध्यातही दर नोव्हेंबरच्या तुलनेत कमीच आहेत. देशातील सुतगिरण्या आता ९० टक्के क्षमतेने सुरु आहेत.

कापड उद्योगाकडून सुताला मागणीही वाढली आहे. त्यामुळे देशातील पुढील काळात कापड आणि सूत निर्यात वाढू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com