top 5 news: ब्राझीलमधील सोयाबीन काढणी पोचली ८० टक्क्यांवर

ब्राझीलमधील सोयाबीन काढणी जोमात सुरु आहे. येथील काही राज्यांत उशिरा पेरणी झाल्याने काढणीलाही उशीर होत आहे. येथील पिकावर दुष्काळाचा परिणाम मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. येथील पेरणीची नेमकी स्थिती काय आहे?
soybean
soybeanagrowon

1. राज्यात उन्हाचा चटका कायम असला तरी उष्णतेची लाट ओसरली आहे. पावसाला पोषक हवामानामुळे राज्यात ढगाळ हवामान झाले आहे. आज राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार असून, दक्षिण मध्य महाराष्ट्रात विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकण, मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता (Rain)हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत मेघगर्जना, विजांसह पाऊस होण्याचा इशारा दिला आहे.

2. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचा(Edible oil) तुटवडा जाणवत आहे. मात्र मलेशियात पामतेलाचा शिल्लक साठा वाढण्याचा अंदाज आहे. येथील एका संस्थेच्या मते मलेशियात मार्च महिन्याच्या शेवटी १५ लाख ६० हजार टन पामतेलाचा साठा होता. इंडोनेशियात पामतेलाची टंचाई जाणवत असताना मलेशियात मात्र पामतेल उपलब्ध असल्याचे या संस्थेचे म्हणणे आहे. तसेच आतापर्यंतच्या अनुभवासार मलेशियात पामतेलाचा साठा घटत असतो. मात्र यंदा पहिल्यांदा साठा वाढला आहे.

soybean
भात खरेदीः तेलंगणाचे आक्षेप केंद्राला अमान्य

3. देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये मोहरीचे दर सुधारले आहेत. सुरूवातीला आवकेचा दबाव वाढल्यानंतर मोहरीच्या दरात काहीशी नरमाई आली होती. मात्र शेतकऱ्यांनी(Farmer) कमी दरात मोहरी विक्री थांबविली. त्यामुळे ७ एप्रिलपासून दर काहीसे सुधारले. देशात सध्या खाद्यतेलाचा मोठा तुटवडा आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांनी आवकेचा दबाव निर्माण न होऊ देता माल विकला. त्यामुळे त्यांना हमीभावापेक्षा अधिक दर मिळाले. हा अनुभव लक्षात घेऊन मोहरी उत्पादकही तोच कित्ता गिरवत आहेत. दर कमी झाल्याने शेतकऱ्यांनी मोहरीची विक्री थांबविली. त्यामुळे ऐन हंगामात प्रतिक्विंटल ५० रुपयांच्या दरम्यान दर सुधारले. यामुळे पुढील काळात मोहरी उत्पादक विक्री कशी करतात, हे बाजाराच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे.

4. आंबाप्रेमींकडून मोठी मागणी असलेला बैगनपल्ली आंबा आता नागपूरच्या बाजारात डेरेदाखल होत आहे. मात्र, यावर्षी आंध्रप्रदेशात या आंब्यांचे उत्पादन फक्त २० टक्केच असल्याने हा आंबा भाव खात आहे. ठोक बाजारात ८० ते १२० रुपये किलो आणि किरकोळ बाजारात १८० ते २०० रुपये किलो या दराने बैगनपल्ली आंब्याची विक्री होत आहे. त्यामुळे हा आंबा सध्या तरी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. आंध्र प्रदेशातून सध्या २० ते ३० टन बैगनपल्ली आंब्याची आवक सुरु झालेली आहे. आंब्याचे उत्पादन यंदा ७० ते ८० टक्के कमी झालेले आहे. त्यामुळे आंब्याचे दर वाढलेले आहे.

5. ब्रझीलमध्ये सोयाबीन काढणी (Soybean harvesting)वेगाने सुरु आहे. ब्राझीलमध्ये अनेक राज्यांत सोयाबीन काढणी अंतिम टप्यात आहे. महत्वाच्या रिओ ग्रॅंड डो सूल या राज्यात पेरणी उशिरा झाली होती. तसेच या भागात यंदा भीषण दुष्काळाची स्थिती होती. पंरतु शेवटच्या टप्प्यात झालेल्या पावसामुळे पिकाला दिलासा मिळाला. परंतु येथील सोयाबीन पिकाची काढणीही लांबली आहे. गेल्या आठवड्यापर्यंत ब्राझीलमधील ८० टक्के सोयाबीन काढणी पूर्ण झाली होती. तर गेल्या वर्षी याच काळात ७६ टक्के सोयाबीनची काढणी पूर्ण झाली होती. ब्राझीलमधील माटो ग्रासो आणि माटो ग्रोसो डो सूल या राज्यांत सोयाबीन काढणी पूर्ण झाली आहे. आत्तापर्यंत ब्राझीलमध्ये केवळ रिओ ग्रॅंड डो सूल या राज्यात सर्वांत कमी सोयाबीन काढणी झाली. येथे सोयाबीनखालील केवळ १९ टक्के क्षेत्र रिकामे झाले. तर पराना राज्यात काढणी ८३ टक्क्यांवर पोचली. पराना हे ब्राझीलमधील दुसऱ्या नंबरचे महत्त्वाचे सोयाबीन उत्पादक राज्य आहे. परानामध्येही यंदा भीषण दुष्काळी स्थिती होती. येथील उत्पादन ११५ लाख टनांवर स्थिरावण्याची शक्यता आहे. मागील हंगामात येथे १९८ लाख टन उत्पादन झाले होते. हंगामाच्या प्रारंभी पराना राज्यात २२० लाख टनांचा अंदाज व्यक्त करण्यात आलो होता. मात्र दुष्काळामुळे चित्र उलटेपालटे झाले. एकूणच काय तर यंदा ब्राझीलमधील सोयाबीन पिकाला दुष्काळाचा मोठा फटका बसला. यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. सोयाबीन काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. थोड्याच काळात सोयाबीन उत्पादनाचे चित्र आणखी स्पष्ट होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com