Cotton Market : कापूस बाजाराला सरकी दराचा मजबूत आधार

देशात सरकीचे भाव मागील दोन महिन्यांपासून टिकून आहेत. सरकी पेंड आणि सरकी तेलाचेही दर वाढलेले आहेत. यामुळे सरकीच्या दरात तेजी आहे.
 Cotton Market
Cotton MarketAgrowon

अनिल जाधव
पुणेः देशात सरकीचे भाव (Cotton Cake Rate) मागील दोन महिन्यांपासून टिकून आहेत. सरकी पेंड (Cottaon Cake) आणि सरकी तेलाचेही दर वाढलेले आहेत.

यामुळे सरकीच्या दरात तेजी आहे. यंदा कापूस दर (Cotton Rate) टिकून राहण्यासाठी सरकी दरातील या तेजीचा आधार मिळाला.

तसेच सध्या कमी झालेले कापूस दर पुन्हा वाढण्यास सरकीचाही मोठा हातभार असेल, असे कापूस बाजारातील (Cotton Market) अभ्यासकांनी सांगितले.

 Cotton Market
Soybean Rate : सोयाबीन बाजाराला पामतेलाचा आधार

कापसाचे भाव जसे रुईच्या दरावर अवलंबून असतात तसंच सरकीच्या दराचाही कापूस बाजारावर परिणाम होत असतो.

कापसामध्ये फक्त ३५ टक्क्यांपर्यंत रुई असते. तर ६५ टक्क्यांपर्यंत सरकी असते. त्यामुळं सरकीच्या दरासोबतही कापसाचे भाव बदलत असतात.

पण सरकीचे भाव सरकीपासून तयार होणाऱ्या पेंड म्हणजेच ढेप आणि सरकी तेलाच्या दरावर अवलंबून असतात. 

 Cotton Market
हरभरा बाजाराला नाफेडच्या खरेदीचा आधार

देशातील बाजारात सध्या कापसाचे भाव क्विंटलमागं ५०० रुपयांपर्यंत नरमले आहेत. मागील आठवड्यात कापूस भाव सरासरी ८ हजार ५०० ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान होते.

ते आता ८ हजार ते ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान पोचले आहेत. कापूस दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांनी विक्री काहीशी कमी केली.

पण बाजारात काही अफवा पसरवून शेतकऱ्यांनाच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण जाणकारांच्या मते कापसाचे भाव जास्त तुटणार नाहीत.

सरकी दराचा आधार कापसाला मिळत असल्याचेही जाणकारांनी सांगितले.

सरकी पेंडेला उठाव
बाजारात सरकी ढेपेचे भाव २ हजार ८०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. सध्या मका आणि सोयापेंडचे भाव काहीसे जास्त आहेत.

त्यामुळं पशुखाद्य उद्योगातून सरकी पेंडेला मागणी वाढली. त्यामुळं सरकी पेंडेचे दर टिकून आहेत. वायद्यांमध्येही पेंडेचे दर तेजीत आहेत.

फेब्रुवारी वायदे २९५० रुपयांवर आहेत. सरकी पेंडेचे भाव तेजीत असल्याचा आधार सरकी दराला मिळत आहे.

सरकी तेलाचे भाव तेजीत
सरकी तेलाचेही दर सध्या तेजीत आहेत. सरकी तेलाचा भाव ऑक्टोबर महिन्यात २ हजार २५० रुपये प्रतिक्विंटल होता. पण त्यानंतर सरकी तेलाच्या दरात वाढ होत गेली.

मागील महिन्यात सरकी तेलाने ३ हजार २१० रुपयांचाही टप्पा गाठला होता. मात्र त्यात आता काहीशी नरमाई येऊन दर ३ हजार रुपयांच्या जवळपास आहेत.

सरकी तेलाच्या दरामुळेही सरकीचे दर टिकून आहेत.

सरकीचे भाव वाढलेलेच
सरकी पेंड आणि सरकी तेलाचे भाव तेजीत असल्यामुळे सरकीचे दर टिकून आहेत. सरकीच्या दरानं ऑक्टोबरपासून पुढेच वाटचाल केली.

सध्या देशातील बाजारात सरकीला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ४०० ते ४ हजार रुपये दर मिळत आहे.

खाद्यतेल बाजार आणि तेलबिया पेंडेच्या दराचाही सरकीला आधार मिळत आहे. सरकीचे भाव तेजीत असल्याने कापसाचे दर टिकून आहेत.

तसेच कापूस दर वाढण्यास सरकीच्या तेजीचा हातभार लागत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com