‘स्मार्ट एगटेक’साठी अर्ज स्वीकारणी सुरू

कृषी विभागाने ‘स्मार्ट एगटेक इंटिग्रेशन फॅसिलिटी २०२२’ उपक्रमाच्या कामाला सुरुवात केली आहे
‘स्मार्ट एगटेक’साठी अर्ज स्वीकारणी सुरू
स्मार्ट एगटेकagrowon

पुणे ः ‘‘कृषी विभागाने ‘स्मार्ट एगटेक इंटिग्रेशन फॅसिलिटी २०२२’ उपक्रमाच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यासाठी अर्ज स्वीकारणी ६ जूनपर्यंत चालू राहील,’’ अशी माहिती ‘स्मार्ट’चे अतिरिक्त संचालक डॉ. दशरथ तांभाळे यांनी दिली.

राज्यात ‘स्मार्ट’ अर्थात ‘बाळासाहेब ठाकरे ॲग्रिबिझनेस व रूरल ट्रान्सफॉरमेशन’ हा प्रकल्प जागतिक बँक व राज्य शासन संयुक्तपणे राबवत आहे. स्पर्धात्मक कृषी मूल्यसाखळीमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या सहभागासाठी सक्षम करण्याकरिता या प्रकल्पांतर्गत विविध उपक्रम राबविले जातात. ‘समुदाय आधारित संस्थानी कृषी तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे’ हा याच उपक्रमाचा एक उपघटक आहे. त्यातून शेतकऱ्यांना आर्थिक, निविष्ठा तंत्रज्ञान आणि बाजारपेठ या क्षेत्रात प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

‘स्मार्ट एगटेक’(‘Smart Agtech) हा भारतातील पाहिला कोरिया वर्ल्ड बँक पार्टनरशिप फॅसिलिटी उपक्रम आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक सेवापुरवठादार या https://smartagtech.org संकेतस्थळावर अर्ज सादर करू शकतील. शेतकरी समूहांसाठी डिजिटायझेशन सोल्यूशन्स, मूल्यसाखळी विकास, काटेकोर कृषी, ऑटोमेशन, शहरी अन्नप्रणाली व लॉजिस्टिक सोल्यूशन्स, मार्केट लिंकेज व ट्रेसेबिलिटी सोल्यूशन्स, आर्थिक सेवा या क्षेत्रात काम करणाऱ्या सेवापुरवठादारांना या उपक्रमात संधी मिळेल.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com