जागतिक अन्नधान्य भाववाढ विक्रमी पातळीवर

रशिया-युक्रेन युद्धाचा फटका जगाला बसत आहे. रशिया आणि युक्रेन गहू, मका, सूर्यफूल आणि खते उत्पादनात आघाडीवर आहेत. युद्धामुळे या सर्व मालांची निर्यात ठप्प झाली.
food grain prices
food grain pricesagrowon

1. वाढत्या उन्हामध्ये विदर्भ होरपळून निघाला आहे. वर्धा येथे मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये देशातील सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उद्या विदर्भात उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात विजा, वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत राज्याच्या विविध भागात वादळी पावसाने हजेरी लावली. ढगाळ हवामानामुळे राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. आता पुन्हा उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता असून, विदर्भात उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

2. यंदा देशात विक्रमी तूर आणि हरभरा उत्पादन होईल, असा अंदाज केंद्र सरकारने व्यक्त केला होता. मात्र डाळ उद्योगाला हा दावा मान्य नाही. या उद्योगाच्या प्रतिनिधींच्या मते देशात यंदा ३६ लाख टन तुरीचे उत्पादन होईल. मागील हंगामातील शिल्लक तूर(Tur) २ लाख ५८ हजार टन होती. तर आयात ८ लाख ३० हजार हजार टन राहिली. म्हणजेच तुरीचा एकूण पुरवठा ४६ लाख ८८ हजार टनांवर होईल, असे गणित उद्योगाने मांडले. तर दशाचा वार्षिक वापर ४५ लाख टनांचा आहे. म्हणजेच पुढील हंगामासाठी गेल्या वर्षीपेक्षाही कमी साठा राहील, असा डाळ उद्योगाचा अंदाज आहे. परंतु सरकारने तूर आयातीची मुदत वाढविल्याने आणखी आयात होण्याची शक्यता आहे.

3. इंडोनेशियाने रिफाईंड आणि पामोलिन निर्यातीवर बंदी घातली. त्यामुळे देशात पामतेलाचा(Palm oil) पुरवठा कमी होईल. असे झाल्यास देशात खाद्यतेलाच्या दरात आणखी तेजी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कॅनोला तेल आयातीवर शुल्क कमी करण्याची मागणी साॅल्व्हेंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशनने सरकारकडे केली. सध्या कॅनोला तेल आयातीवर ३८.५ टक्के शुल्क आहे. हे आयातशुल्क ५.५ टक्क्यांवर आणावे अशी मागणी करण्यात आली आहे. कॅनोला तेलाच्या आयातशुल्कात कपात केल्यास देशात खाद्यतेल पुरवठा वाढीस मदत होईल, असे असोसिएशनच्या अध्यक्षांचे म्हणणे आहे.

4. खुल्या बाजारात हरभऱ्याला हमीभावापेक्षा कमी दर आहेत. यंदा केंद्राने हरभऱ्यासाठी ५ हजार २३० रुपये हमीभाव जाहीर केला. मात्र खुल्या बाजारात केवळ ४ हजार ५०० ते ५ हजार १०० रुपयांपर्यंत दर मिळत आहेत. त्यामळे नाफेडची हमीभावाने हरभरा खरेदी वेगाने सुरु आहे. नाफेडने देशभरात आत्तापर्यंत ८ लाख १० हजार टन खरेदी केली. त्यात गुजरातमध्ये विक्रमी ३ लाख ६९ हजार टन खरेदी झाली. तर महाराष्ट्रात ३ लाख ३६ हजार टन हरभरा शेतकऱ्यांनी नाफेडला विकला. तसेच कर्नाटकात ६५ हजार टन तर आंध्र प्रदेशात ३८ हजार टन सरकारी खरेदी झाली.

food grain prices
भातपिकाच्या हंगामात पंजाबला हवा आहे सलग वीजपुरवठा

5. रशिया-युक्रेन युद्धाचा फटका जगाला बसत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे इतर देश अनेक कमोडिटीजसाठी या दोन्ही देशांवर अवलंबून आहेत. रशिया आणि युक्रेन गहू,(Wheat) मका, सूर्यफूल आणि खते उत्पादनात आघाडीवर आहेत. युद्धामुळे या सर्व मालांची निर्यात ठप्प झाली. त्यामुळे दर आभाळाळा भिडले. त्याचा परिणाम म्हणून महागाई वाढली. त्याचा परिणाम केवळ या दोन्ही देशांवरच नाही तर जगावर झाला. संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न आणि कृषी संघटना अर्थात एफएओच्या मते जागतिक अन्नधान्य महागाई मार्च २०२२ मध्ये १३ टक्क्यांनी वाढली. ती विक्रमी पातळीवर पोचली. दोन्ही देशांतील युद्ध सुरु झाल्यानंतर गहू, मका, जवस, खाद्यतेल, बार्ली, डेअरी उत्पादने आणि साखरेच्या दरात मोठी वाढ झाली. सूर्यफुल तेलाचा पुरवठा कमी झाल्याने खाद्यतेलांचे दर विक्रमी पातळीवर पोचले. गहू उत्पादन आणि निर्यातीत रशिया जगात आघाडीवर आहे. तर युक्रेन पाचव्या क्रमांकावर. मका निर्यातीतही युक्रेन चौथ्या स्थानावर टिकून असतो. सूर्यफुल तेल उत्पादनात तर युक्रेन जगात आघाडीवर आहे. रशियाही या मालांच्या उत्पादन आणि निर्यातीत आघाडीवर आहे. मात्र दोन्ही देशांतील युद्धामुळे निर्यात ठप्प झाली. त्यामुळे जागतिक बाजारात या मालांची टंचाई जाणवत आहे. गव्हाचा विचार करता भारत वगळता कुठल्याच देशात नवीन माल नाही. ऑस्ट्रेलिया आणि अर्जेंटिनाचा गहू यापूर्वीच येऊन गेला. तर अमेरिका, कॅनडा, युरोपियन संघ, रशिया आणि युक्रेन या देशांचा माल जुलै आणि ऑगस्ट महिन्यात हाती येईल. इतर पिकांच्या बाबतही हीच स्थिती आहे. त्यामुळे अन्नधान्यातील भाववाढ लगेच कमी होण्याची शक्यता दिसत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com