मराठवाड्यातील ४२ साखर कारखान्यांचा हंगाम उरकला

तीन कोटी लाख टन ऊस गाळप; ३ कोटी २० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन
मराठवाड्यातील ४२ साखर कारखान्यांचा हंगाम उरकला
SugarcaneAgrowon

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील साठ कारखान्यांपैकी ४२ कारखान्यांचा हंगाम (Sugar Mill) २ मेपूर्वीच उरकला आहे. मराठवाड्यातील कारखान्यांनी तीन कोटी २१ लाख ९ हजार २१ टन उसाच्या गाळपातून (Sugarcane Crushing) ३ कोटी २० लाख ७५ हजार ५४९ क्विंटल साखरेचे उत्पादन (Sugar Production) केल्याची माहिती साखर विभागाच्या सूत्रांनी दिली.

मराठवाड्यातील लांबलेला ऊस गाळप हंगाम आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करीत असल्याची स्थिती आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील १४ कारखान्यांनी ७० लाख ५३ हजार ९६ टन उसाचे गाळप करत सरासरी ९.५९ टक्के साखर उताऱ्याने ६७ लाख ६५ हजार ५६४ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. औरंगाबाद जिल्ह्यातील ७ कारखान्यांनी २८ लाख ५८ हजार ५१३ टन उसाचे गाळप करत सरासरी १०.४४ टक्के साखर उताऱ्याने २९ लाख ८३ हजार २७५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

जालना जिल्ह्यातील ५ कारखान्यांनी २८ लाख ४९ हजार ५६९ टन उसाचे गाळप करत सरासरी १०.५१ टक्के साखर उताऱ्याने २९ लाख ९५ हजार ५०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. बीड जिल्ह्यातील ७ कारखान्यांनी ४६ लाख ९५ हजार ७७१ टन उसाचे गाळप करत सरासरी ८.६८ टक्के साखर उताऱ्याने ४० लाख ७४ हजार ५५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. परभणी जिल्ह्यातील ६ कारखान्यांनी ४० लाख ४६ हजार ७८७ टन उसाचे गाळप करत सरासरी १०.४१ टक्के साखर उताऱ्याने ४२ लाख १३ हजार ७४५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. हिंगोली जिल्ह्यातील ५ कारखान्यांनी २१ लाख ४८ हजार ८ टन उसाचे गाळप करत सरासरी १०.५४ टक्के साखर उताऱ्याने २२ लाख ६४ हजार १७० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

नांदेड जिल्ह्यातील ६ कारखान्यांनी २५ लाख ३० हजार ७०७ टन उसाचे गाळप करत २४ लाख ७९ हजार ३५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ९.८० टक्के राहिला. लातूर जिल्ह्यातील १० कारखान्यांनी ५९ लाख २६ हजार ५७० टन उसाचे गाळप करत सरासरी १०.६३ टक्के साखर उताऱ्याने ६२ लाख ९९ हजार ७१० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

हिंगोली, नांदेडमधील सर्वच कारखान्यांचा हंगाम गुंडाळला

मराठवाड्यातील हिंगोली व नांदेड जिल्ह्यांतील अनुक्रमे ५ व ६ मिळून सर्व अकरा कारखान्यांचा हंगाम गुंडाळला. दुसरीकडे लातूर जिल्ह्यातील ५, परभणीतील ५, बीडमधील ४, जालन्यातील १, औरंगाबादमधील ५ व उस्मानाबादमधील सर्वाधिक ११ कारखान्यांनी दोन जून पूर्वी आपले गाळप थांबविले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com