परतूर बाजारात सोयाबीन दरात चढ-उतार

राज्यातल्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला आज किती भाव मिळाले हे जाणून घेऊ.
परतूर बाजारात सोयाबीन दरात चढ-उतार
soybeanagrowon

मराठवाड्यातील महत्त्वाच्या सोयाबीन बाजारांपैकी एक असलेल्या बीड बाजारामध्ये आज 9 जून रोजी 170 क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आणलं गेलं. या मालाचे भाव किमान 5600 रुपये ते कमाल 6651 रुपयांच्या दरम्यान राहिले. तसेच आवक मालाचे सर्वात जास्त व्यवहार 6427 रुपयांनी झालेत. हिंगोली बाजारात आज सोयाबीनची आवक घटली होती.तिकडे पैठण बाजारात 10 क्विंटलवर आवक झाली. या आवक मालाला किमान 5960तर कमाल 6000 रुपयांचा दर (rate)मिळाला. इथं सर्वसाधारण दर5991 रुपयांचा राहिलाय.दुसरीकडे परतूर बाजारात किमान 6100 रुपये तर कमाल 6601 रुपयांचा दर होता. तर सर्वसाधारण दर 6460 होता.

अमरावती बाजारात सोयाबीनची आज 9 जून रोजी 2226 क्विंटल आवक झाली. आवक झालेल्या सोयीबनला आज किमान 6150

रुपये तर कमाल 6418 रुपये दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर 6284 रुपयांवर होता.अकोला बाजारात सोयाबीनची(soybean) 1050 क्विंटल आवक झाली असून किमान भाव 6000 रुपये होता. तर कमाल भाव 6695 रुपयांचा मिळालाय. या मालाला सर्वसाधारण 6375 चा भाव मिळालाय.चिखली बाजारात सोयाबीनला किमान 5800 रुपये दर मिळाला. तर कमाल व्यवहार 7100 रुपयाने झाले. सरासरी दर 6450 रुपये मिळाला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com