मराठवड्यातील बाजारात सोयाबीन आवक मंदावली

राज्यातल्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला आज किती भाव मिळाले हे जाणून घेऊ.
soybean
soybeanagrowon

मराठवाड्यातील महत्त्वाच्या सोयाबीन बाजारांपैकी एक असलेल्या वसमत बाजारामध्ये आज 30 मे रोजी 227 क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आणलं गेलं. या मालाचे भाव किमान 5800 रुपये ते कमाल 6760 रुपयांच्या दरम्यान राहिले. तसेच आवक मालाचे सर्वात जास्त व्यवहार 6467 रुपयांनी झालेत. वसमत बाजारात आज सोयाबीनची आवक घटली होती.तिकडे गंगाखेड बाजारात 35 क्विंटलवर आवक झाली. या आवक मालाला किमान 6500 तर कमाल 6900 रुपयांचा दर मिळाला. इथं सर्वसाधारण दर(rate) 6600 रुपयांचा राहिलाय.दुसरीकडे सेलू बाजारात किमान 6000 रुपये तर कमाल 6350 रुपयांचा दर होता. तर सर्वसाधारण दर 6221 होता.अकोला बाजारात सोयाबीनची आज 30 मे रोजी 1607 क्विंटल आवक झाली. आवक झालेल्या सोयीबनला(soybean) आज किमान 6000 रुपये तर कमाल 6675 रुपये दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर 6385 रुपयांवर होता. अकोला बाजारात आज सोयाबीन आवक घटली होती.

अकोला बाजारात सोयाबीनची आज 30 मे रोजी 1607 क्विंटल आवक झाली. आवक झालेल्या सोयीबनला आज किमान 6000 रुपये तर कमाल 6675 रुपये दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर 6385 रुपयांवर होता. अकोला बाजारात आज सोयाबीन आवक घटली होती.चिखली बाजारात सोयाबीनची 725 क्विंटल आवक झाली असून किमान भाव 6011 रुपये होता. तर कमाल भाव 7311 रुपयांचा मिळालाय. या मालाला सर्वसाधारण 6661 चा भाव मिळालाय.नागपूर बाजारात सोयाबीनला किमान 5400 रुपये दर मिळाला. तर कमाल व्यवहार 5800 रुपयाने झाले. सरासरी दर 5725 रुपये मिळाला.तसेच मेहकर बाजारात सोयाबीनला 6000 रुपये किमान दर मिळाला. तर कमाल दर 6600 रुपयांवर होते. तर जास्तीत जास्त आवक मालाला सर्वसाधरण दर 6350 रुपये मिळाला

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com