विदर्भात सोयाबीन दर काहीसे नरमले

राज्यातल्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला आज किती भाव मिळाले हे जाणून घेऊ.
 विदर्भात सोयाबीन दर काहीसे नरमले

अकोला बाजारात सोयाबीनची आज 24 मे रोजी 1587 क्विंटल आवक झाली. आवक झालेल्या सोयीबनला आज किमान 5550 रुपये तर कमाल 7000 रुपये दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर 6300 रुपयांवर होता. अकोला बाजारात आज सोयाबीन आवक घटली होती.मलकापूर बाजारात सोयाबीनची 177 क्विंटल आवक झाली असून किमान भाव 57250 रुपये होता. तर कमाल भाव 6690 रुपयांचा मिळालाय. या मालाला सर्वसाधारण 6275 चा भाव मिळालाय.देऊळगाव राजा बाजारात सोयाबीनला किमान 5000 रुपये दर(rate) मिळाला. तर कमाल व्यवहार 6400 रुपयाने झाले. सरासरी दर 6000 रुपये मिळाला.तसेच आष्टी बाजारात सोयाबीनला 6000 रुपये दर मिळाला. तर कमाल दर 6500 रुपयांवर होते. तर जास्तीत जास्त आवक मालाला सर्वसाधरण दर 6250 रुपये मिळाला.

मराठवाड्यातील महत्त्वाच्या सोयाबीन(soybean) बाजारांपैकी एक असलेल्या बीड बाजारामध्ये आज 24 मे रोजी 137 क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आणलं गेलं. या मालाचे भाव किमान 6000 रुपये ते कमाल 6750 रुपयांच्या दरम्यान राहिले. तसेच आवक मालाचे सर्वात जास्त व्यवहार 6397 रुपयांनी झालेत. बीड बाजारात आज सोयाबीनची आवक वाढली होती.तिकडे तुळजापूर बाजारात 155 क्विंटलवर आवक झाली. या आवक मालाला किमान 6400 तर कमाल 6600 रुपयांचा दर मिळाला. इथं सर्वसाधारण दर 6500 रुपयांचा राहिलाय.दुसरीकडे पैठण बाजारात किमान 5876 रुपये तर कमाल 6285 रुपयांचा दर होता. तर सर्वसाधारण दर 6226 होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com