कारंजा बाजारात सोयाबीन दर स्थिर

राज्यातल्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला आज किती भाव मिळाले हे जाणून घेऊ.
soybean
soybeanagrowon

कारंजा बाजारात सोयाबीनची आज 21 मे रोजी 2000 क्विंटल आवक झाली. आवक झालेल्या सोयीबनला आज किमान 6440 रुपये तर कमाल 7025 रुपये दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर 6850 रुपयांवर होता. कारंजा बाजारात आज सोयाबीन आवक घटली होती.नागपूर बाजारात सोयाबीनची 436 क्विंटल आवक झाली असून किमान भाव 5600 रुपये होता. तर कमाल भाव 6850 रुपयांचा मिळालाय. या मालाला सर्वसाधारण 6537 चा भाव मिळालाय.देऊळगाव राजा बाजारात सोयाबीनला किमान 5600 रुपये दर मिळाला. तर कमाल व्यवहार 6200 रुपयाने झाले. सरासरी दर 600 रुपये मिळाला.तसेच मुरुम बाजारात सोयाबीनला 6500 रुपये दर मिळाला. तर कमाल दर 6700 रुपयांवर होते. तर जास्तीत जास्त आवक मालाला सर्वसाधरण दर 6600 रुपये मिळाला.

मराठवाड्यातील महत्त्वाच्या सोयाबीन बाजारांपैकी एक असलेल्या लातूर बाजारामध्ये आज 21 मे रोजी 6415 क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आणलं गेलं. या मालाचे भाव किमान 6500 रुपये ते कमाल 7010 रुपयांच्या दरम्यान राहिले. तसेच आवक मालाचे सर्वात जास्त व्यवहार 6900 रुपयांनी झालेत. जालना बाजारात आज सोयाबीनची आवक वाढली होती.तिकडे बीड बाजारात 57 क्विंटलवर आवक झाली. या आवक मालाला किमान 6200 तर कमाल 6550 रुपयांचा दर मिळाला. इथं सर्वसाधारण दर 6412 रुपयांचा राहिलाय.दुसरीकडे परतूर बाजारात किमान 6200 रुपये तर कमाल 6650 रुपयांचा दर होता. तर सर्वसाधारण दर 6650 होता.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com