तांदळासाठी जगाची भारतावर भिस्त

२००७ मध्ये भारताने जेव्हा तांदूळ निर्यात बंद केली. तेव्हा जागतिक बाजारात तांदुळाच्या किमती आभाळाला भिडल्या होत्या. त्यामुळे प्रमुख तांदूळ निर्यात देश म्हणून भारताच्या हालचालीकडे जगाचे लक्ष आहे.
तांदळासाठी जगाची भारतावर भिस्त
Rice ExportAgrowon

केंद्र सरकारने गव्हावर निर्यातीबंदी (Wheat Export Ban) घातल्यामुळे आता तांदूळाच्या निर्यातीवर (Rice Export) मर्यादा घातली जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी तांदूळ खरेदी वाढवण्याचे करार आणि दीर्घ मुदतीच्या डिलिव्हरीसाठी करार केले आहेत. मात्र भारत तांदळाचा (Indian Rice) सर्वात मोठा निर्यातदार असल्यामुळे त्यावर कुठल्याही प्रकारची निर्यात मर्यादा घालण्याचा सध्या तरी सरकारचा विचार नाही. कारण देशातील बाजारांमध्ये तांदळाचे दर कमी आहेत आणि सरकारी गोदामामध्ये तांदळाचा पुरेसा साठा शिल्लक आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे.

जगभरात अन्नटंचाई तीव्र झाली आहे. त्यामुळे अनेक देशांना महागाईचा सामना करावा लागतोय. त्यामुळे सध्या तरी निर्यातीबद्दल काही ठोस निर्णय घेण्यात आले नाहीत. मात्र यंदाचा हंगाम कसा राहील यावर पुढील निर्यातीबद्दलची भूमिका ठरू शकते, अशी चर्चा सध्या सुरू आहे.

भारतातील तांदूळ हंगाम मॉन्सूमनवर अवलंबून आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी झाले तर तांदळाच्या उत्पादनात घट होईल. त्याचा परिणाम साठ्यावर होईल. त्यावेळी देशातंर्गत अन्नधान्याची गरज भागविण्यासाठी निर्यातीवर बंधन घालण्याचा विचार करण्यात येऊ शकतो, अशी शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे.

चीननंतर तांदळाचा सर्वाधिक वापर भारतामध्ये केला जातो. जगाच्या एकूण तांदळाचा ४० टक्के पुरवठा भारतातून होतो. भारत जगभरातील १५० देशांना तांदळाची निर्यात करतो. २०२१ मध्ये विक्रमी २१.५ दशलक्ष टन तांदूळ निर्यात केला होता. जगातील प्रमुख अन्नधान्य निर्यातदार देशांपेक्षाही भारताने केलेली निर्यात जास्त होती.

२००७ मध्ये भारताने जेव्हा तांदूळ निर्यात बंद केली. तेव्हा जागतिक बाजारात तांदुळाच्या किमती आभाळाला भिडल्या होत्या. त्यामुळे प्रमुख तांदूळ निर्यात देश म्हणून भारताच्या हालचालीकडे जगाचे लक्ष असते. त्यामुळे भारतानं जर निर्यातबंदी संबंधी हालचाली केल्या तर त्याचा फटका जगभर बसेल. त्यातच थायलँड आणि व्हिएतनामसारखे देश आधीच ३० टक्क्यांपर्यंत वाढलेल्या तांदळाच्या किंमतीमध्ये वाढ करतील.

दरम्यान, देशातल्या सरकारी गोदामामध्ये तांदळाचा ५७.८२ दशलक्ष टन साठा आहे. त्यातच स्थानिक बाजरातील तांदळाचे दरही हमीभावपेक्षाही कमी आहेत. तसेच निर्यात केल्या जाणाऱ्या तांदळाचे दरही मागील पाच वर्षातल्या नीचांकी पातळीवर आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
www.agrowon.com