कडधान्य बाजारात माफक तेजीची चिन्हे

सध्या जागतिक कमोडिटी बाजारामध्ये खाद्यतेल, गहू, मका सारख्या शेतीमालातील तेजीचा वारू उधळला असून त्याला एवढ्यातच लगाम घातला जाण्याची लक्षणे दिसत नाहीत. परंतु खनिज तेल मागील आठ-दहा दिवसांत २५-२६ टक्क्यांनी घसरल्यामुळे बाजारात चढ-उतार वाढले आहेत.
There is increase in market value of pulses?
There is increase in market value of pulses?

सध्या जागतिक कमोडिटी बाजारामध्ये खाद्यतेल(Edible oil), गहू (Wheat), मका (Maize) सारख्या शेतीमालातील तेजीचा वारू उधळला असून त्याला एवढ्यातच लगाम घातला जाण्याची लक्षणे दिसत नाहीत. परंतु खनिज तेल मागील आठ-दहा दिवसांत २५-२६ टक्क्यांनी घसरल्यामुळे बाजारात चढ-उतार वाढले आहेत. रशिया-युक्रेन (Russia-Ukrain) युद्ध चौथ्या आठवड्यात प्रवेश करत आहे आणि युक्रेनमधील बंदरे ठप्प पडली आहेत. तहाची बोलणी चालूच आहेत. त्यामुळे पुरवठा साखळी विस्कटलेली आहे.

हेही पाहा-Soybean Price वाढूनही चीनची आयात विक्रमी राहणार

एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे चीन (China) आणि दक्षिण कोरियामध्ये (South Koria) पुन्हा एकदा कोरोनाची लाट आली आहे. पहिल्या तीन-चार लाटांपेक्षा सध्या आलेली कोरोनाची लाट अधिक भीषण असल्याचे चित्र आहे. त्यामुळे चीनमधील १२ शहरांमध्ये लॉक डाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे बंदरांमध्ये मालाच्या चढ-उताराची प्रक्रिया रखडत आहे. त्याचा परिणाम म्हणून पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. या कारणांमुळे शेतीमालाच्या किमतींमध्ये अनिश्चितता दिसून येत आहे. भारतात कोरोना जवळपास संपला अशी वातावरणनिर्मिती झाली आहे. परंतु आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक पूर्ववत केल्यामुळे तसेच लोकांमध्ये देखील कोरोना निर्बंधाकडे दुर्लक्ष करण्याचा कल असल्यामुळे कोरोनाची नवीन लाट येण्याचे संकट दार ठोठावत आहे, असे म्हटेल तर अतिशयोक्ती होणार नाही. एकंदर कमोडिटी बाजारातील अनिश्चितता संपण्याची एवढ्यात शक्यता नाही. हेही वाचा- ‘प्रकाशा-बुराई’च्या ‘सुप्रमा’ला मुहूर्त कधी? : रावल सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी जोरात सुरु आहे. कांद्याचे दर घसरले आहेत. गहू आणि मोहरीचे यंदा विक्रमी पिक असूनही रशिया-युक्रेन युध्दामुळे त्यांचे भाव वाढले आहेत. मात्र कडधान्य बाजार अजूनही तुलनेने मरगळलेलाच आहे. तूर हाती आली असून हरभऱ्याची काढणी देखील अर्ध्याहून अधिक पूर्ण झाल्याचे कृषी मंत्रालयाने म्हटले आहे. येत्या काळात नाफेडतर्फे हरभऱ्याची हमीभावाने खरेदी सुरू होईल. अन्नपदार्थ महागाई निर्देशांक सतत वाढत असल्यामुळे सरकारी पातळीवर साठवणूक मर्यादा (स्टॉक लिमिट) अधिक कडक केली जाण्याची शक्यता आहे. तसेच केंद्राने नुकतेच राज्य सरकारला अन्नपदार्थांच्या पुरवठ्यावर बारीक नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. अशा परिस्थितीमध्ये पुढील दोन-तीन महिन्यांमध्ये तूर आणि हरभरा तसेच एकंदर कडधान्य बाजार कसे राहतील याची माहिती घेऊ.

हेही वाचा- मढी यात्रेला सुरुवात तेजीला सरकारकडून वेसण अलीकडे प्रसिद्ध झालेल्या अनुमानानुसार २०२१-२२ मध्ये कडधान्य उत्पादन विक्रमी २७० लाख टन एवढे होण्याची शक्यता आहे. मुळात आपली गरज २४०-२५० लाख टन एवढीच असल्यामुळे पुरवठा अधिक झाल्यामुळे किंमतींमध्ये मोठी तेजी येणार नाही. सरकारला ती येऊ द्यायची नाही, असेच दिसते. हरभऱ्याचे उत्पादन विक्रमी १३१ लाख टन एवढे होण्याचा अंदाज आहे. तर तुरीचे उत्पादन ४० लाख टन होण्याची शक्यात आहे. मात्र व्यापारी वर्गाचा मागील वर्षाप्रमाणेच या आकड्यांवर विश्वास नसल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षी हरभरा उत्पादन ११९ लाख टन राहील, असा सरकारचा अंदाज होता; परंतु व्यापारी मात्र ७५-८० लाख टनांच्या वर जायला तयार नव्हते. यावर्षी हरभऱ्याचे उत्पादन फार तर ९० लाख टन असेल असे म्हटले जात आहे. जर मागील वर्षी उत्पादन ७५-८० लाख टन होते तर बाजारात टंचाई कशी निर्माण झाली नाही आणि तेजी का आली नाही हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. आणि यावर्षी १०-१५ लाख टन जास्त उत्पादन असेल तर तेजी यायला कारण नाही. जर पुढील वर्षभर हॉटेल्स आणि खानावळी संपूर्ण क्षमतेने चालू राहिल्या, लग्नसराई जोरात झाली आणि सर्व सण निर्बंधमुक्त साजरे करण्यात आले तर हरभरा आणि काही प्रमाणात तूर यांचा खप वाढेल यात शंका नाही. परंतु याबाबत छातीठोकपणे बोलण्यासाठी अजून दोन-तीन महिने थांबणे इष्ट होईल. आयात वाढणार देशांतर्गत उत्पादनाबरोबरच तूर आणि हरभऱ्याची आयात हा मुद्दाही महत्त्वाचा ठरतो. मार्च अखेर संपणाऱ्या वर्षात आफ्रिका आणि म्यानमार येथून सहा लाख टन तुरीची आयात होईल तर हरभरा आयात दीड लाख टन राहील, असे एकंदर चित्र आहे. थोडक्यात कडधान्य आयात मागील वर्षीच्या २१ लाख टनांच्या तुलनेत यंदा १० टक्के वाढण्याची शक्यता आहे. आफ्रिकेतून येणारी तूर ५५-५६ रुपये किलो तर म्यानमार मधील तूर साधारणपणे ६२ रुपये किलो या भावाने येत असल्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील भाव ६५ रुपये किलोच्या दरम्यान स्थिर राहण्याची शक्यता आहे. हरभरा सध्या प्रति क्विंटल ४,७००-४,८०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. होळीपूर्वीची मागणी आता संपली असून नवीन हरभरा बाजारात मोठ्या प्रमाणात येत आहे. त्यातही गुजरात मधील विक्रमी उत्पादनाचा बाजारावर दबाव असल्यामुळे देखील हरभरा हमीभावाखालीच राहिला आहे. पुढील दोन-चार आठवडे किमतींमध्ये १००-२०० रुपयांचा चढ-उतार होत राहील. त्यानंतर लग्नसराई आणि रमजानसाठी देशी आणि काबुली चण्याला निर्यातीची मागणी वाढून भाव मे महिन्यामध्ये हमीभाव पातळी गाठतील किंवा थोडे अधिक देखील राहतील, अशी सध्याची परिस्थिती आहे. उडदामध्ये तेजीवर मर्यादा उडदामध्ये देखील माफक तेजी येण्याची शक्यता आहे. एक तर देशांतर्गत उत्पादन अपेक्षेपेक्षा खूपच कमी झाल्याचे दिसत आहे. उडीद उत्पादनाचा सरकारी आकडा २६ लाख टन असला तरी व्यापारी वर्तुळात मात्र १६-१८ लाख टन एवढेच उत्पादन असल्याचे बोलले जात आहे. मात्र उन्हाळी हंगामामध्ये उडदाचे दोन-चार लाख टन उत्पादन होण्याची शक्यता असल्यामुळे तेजीवर मर्यादा येईल. बाजार धुरीण पुढील महिना-दीड महिन्यामध्ये उडदामध्ये सहा-आठ टक्के वाढीची अपेक्षा व्यक्त करत आहेत. त्या तुलनेत मुगाचा पुरवठा संतुलित असल्यामुळे इतर कडधान्यांमधील वाढीचा फायदा वगळता मूग सामान्यपणे स्थिर राहण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com