छत्तीस कारखाने ३१ मेपर्यंत चालू राहण्याची शक्यता

पुढील आठवड्यात १२६ कारखाने बंद होण्याचा अंदाज
छत्तीस कारखाने ३१ मेपर्यंत चालू राहण्याची शक्यता
sugar Factoriesagrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः शिल्लक उसाच्या मुद्द्यावर संघर्ष टाळण्यासाठी राज्य शासनाच्या सर्व यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. राज्यातील १२६ साखर कारखाने पुढील आठवड्यात बंद होण्याची शक्यता आहे. मात्र अंदाजे ३६ कारखाने ३१ मेअखेरपर्यंत गाळप चालू ठेवतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

शिल्लक ऊस आणि गाळपाची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नियमितपणे घेतली जात आहे. शेतकऱ्यांच्या आडून राजकारण किंवा या मुद्यामुळे कायदा व सुव्यवस्थेला बाधा येणार नाही, याची काळजी राज्य सरकार घेते आहे. दुसऱ्या बाजूला गाळपाच्या प्रगतीबाबत साखर आयुक्त शेखर गायकवाड कारखानानिहाय सतत आढावा घेत आहेत.

राज्य शासनाला सादर केलेल्या एका अहवालात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सहा जिल्ह्यात जास्त ऊस आहे. त्यात बीड (४ लाख टन), जालना (३.९० लाख टन), नगर (३ लाख टन), लातूर (२.२४ लाख टन), उस्मानाबाद (२.३८ लाख टन), सातारा (१ लाख टन) या जिल्ह्यांचा समावेश होतो. “या अहवालातील आकडेवारी गेल्या आठवड्यातील होती. मात्र शिल्लक उसाचे प्रमाण आता अजून घटले आहे,” अशी माहिती साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.

इंद्रायणी भाताचे दर्जेदार बियाणे

चौकट ः
आतापर्यंतच्या नियोजनात काय साधले?
-१३०५ लाख टन ऊस गाळला
- १३५ लाख ८६ हजार टन साखर तयार
-१३१ कारखान्यांची हंगाम संपवून यंत्रे बंद
...........
चौकट ः
पुढे नेमके काय होणार?
- ऊस गाळपासाठी १८ जिल्ह्यांमध्ये यंत्रणा सक्रिय
- १२६ कारखाने २५ मेपर्यंत बंद होण्याची शक्यता
- ३६ कारखाने मात्र ३१ मेअखेर चालू राहणार
- येत्या १०-१२ दिवसांत १९ लाख टन ऊस गाळला जाण्याची शक्यता

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com