राज्यात तीन लाख टन उस अजूनही शिल्लक

मॉन्सून दारात येऊन ठेपला असतानाही राज्यातील ३ लाख टन उसाचे गाळप अजूनही शिल्लक आहे. यात सर्वाधिक उसाचं गाळप बाकी आहे ते मरावाड्यात.
राज्यात तीन लाख टन उस अजूनही शिल्लक
SugarcaneAgrowon

मॉन्सून (Monsoon) दारात येऊन ठेपला असतानाही राज्यातील ३ लाख टन उसाचे (Sugarcane) गाळप अजूनही शिल्लक आहे. यात सर्वाधिक उसाचं गाळप बाकी आहे ते मरावाड्यात. (Sugarcane Marathwada) दरवर्षी साधारण मेच्या शेवटापर्यंत गाळप हंगाम पूर्ण होणं अपेक्षित असतं. मात्र यंदा उस लागवडी खालील क्षेत्र वाढल्याने १ जूनपर्यंत २० साखर कारखान्यांचं गाळप सुरूच आहे. मराठवाड्यात हंगामाच्या सुरुवातीला एकूण ६० साखर कारखान्यांनी गाळप सुरू केलं होतं.

एकीकडे मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद आणि बीड या जिल्ह्यात सर्वाधिक उस शिल्लक आहे. तर दुसरीकडे राज्यात उसाचं टिपरूही शिल्लक ठेवणार नाही, असा दावा प्रशासनाच्या पातळीवरून करण्यात येतो आहे.

राज्यातील इतर भागातील गाळप हंगाम संपला असला, तरीही मराठवाड्यात अजूनही गाळप सुरूच आहे. ज्या शेतकऱ्यांचा ऊस उभा आहे, अशा शेतकऱ्यांची चिंता मात्र मॉन्सून सक्रिय झाल्यामुळे वाढली आहे. १ जूनपर्यंत राज्यातील १३१६.८ लाख टन उसाचे गाळप केले असून त्यातून १३६९.६१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

दरम्यान, राज्य सरकारने राज्यातील सर्व उसाचे गाळप केल्याशिवाय कारखाने बंद न करण्याचे आदेश कारखान्यांना दिला आहेत. त्यासाठी राज्य सरकारने अनुदानसुद्धा दिले आहे. मात्र मॉन्सून सक्रिय झाल्याने उस उभा असलेल्या क्षेत्रात पाऊस पडला तर उस तोडणी कठीण होईल. त्यातच पुढील हंगामासाठी कारखान्याची देखभाल करण्यासाठीही कारखान्यांना वेळ मिळणार नाही, याची कारखानदारांना चिंता आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com