तुर्कस्तानने परत पाठवला भारताचा हजारो टन गहू

रुबेला विषाणूचे कारण देत ५६ हजार ८७७ टनांची खेप नाकारली
तुर्कस्तानने परत पाठवला भारताचा हजारो टन गहू
Wheat ProcurementAgrowon

नवी दिल्ली ः एकीकडे जगभरातील देश भारताला गव्हाच्या निर्यातीवरील बंदी (wheat Export) हटवण्याची मागणी करीत आहे, तर दुसरीकडे तुर्कस्तानने भारतीय गहू खराब (Damage Wheat) असल्याचे सांगून परत केला. २९ मेपासून ५६,८७७ टन भारतीय गहू भरलेली जहाजे तुर्कस्तानातून गुजरातच्या बंदरांवर परत आणली जात आहेत. गव्हात रुबेला विषाणू (Rubella virus) आढळल्याचे तुर्कस्तानने म्हटले आहे. त्यामुळे ते परत पाठवत आहेत.

तुर्कस्तानने फायटोसॅनिटरी चिंतेमुळे भारतीय गव्हाची खेप नाकारली आणि ती परत पाठवली. ही जहाजे तुर्कस्तानहून गुजरातमधील कंडाळा बंदरात परत येत आहेत. भारतातून आलेल्या गव्हामध्ये रुबेला विषाणू आढळून आला होता. त्यामुळे तुर्कस्तानच्या कृषी आणि वन मंत्रालयाने त्याचा वापर करण्यास परवानगी दिली नाही, असे तुर्कस्तानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तुर्कस्तानच्या या निर्णयामुळे भारतीय व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

आतापर्यंत भारताच्या वाणिज्य आणि कृषी मंत्रालयांनी परिस्थितीवर भाष्य केलेले नाही. अधिकारी मानतात की भारतीय रुबेला वनस्पती रोग कोणत्याही आयातदार देशासाठी गंभीर चिंतेचे कारण असू शकते. मात्र भारतीय गव्हाच्या बाबतीत हे एक दुर्मीळ उदाहरण आहे.

रुबेला विषाणू किंवा जर्मन गोवर हा विषाणूजन्य संसर्गजन्य रोग आहे. हे बऱ्याचदा शरीरावर विशिष्ट लाल पुरळ दर्शवते. यामुळे संसर्गजन्य रुग्णांमध्ये कोणतीही विशिष्ट लक्षणे दिसून येत नाहीत. रुबेला विषाणूचा संसर्ग ३-५ दिवस टिकू शकतो आणि जेव्हा संक्रमित व्यक्ती खोकते, शिंकते किंवा नाक आणि घशातून स्राव येतो तेव्हा त्याचा प्रसार होऊ शकतो.

काश्‍मीरबाबतच्या ठरावांना एर्दोगन यांचा पाठिंबा

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासोबतच्या संयुक्त परिषदेत एर्दोगन यांनी पाकिस्तानची बाजू घेतली. काश्मीरबाबतच्या ठरावांना आपला पाठिंबा आहे आणि या दशकांहून जुना वाद संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांनुसार सोडवायचा आहे, असे ते म्हणाले. २०२३ पासून पाकिस्तान आणि तुर्कस्तान एकत्र युद्धनौका तयार करतील, असेही तुर्कस्तानच्या अध्यक्षांनी सांगितले. याआधीही अध्यक्ष एर्दोगन यांनी काश्मीरवर भाष्य केले होते.

गव्हाच्या किमती खाली येऊ शकतात?

जग कोरोनाशी झुंज देत आहे. युक्रेन-रशिया यांच्यातील महायुद्धामुळे भारतीय गव्हाची मागणी वाढली आहे. यामुळे भारताला निर्यातीवर बंदी घालावी लागली. भारतीय गव्हात रुबेला विषाणू असल्याचे आरोप चिंताजनक असू शकतात. रुबेलाच्या चिंतेमुळे तुर्कस्तानने भारतीय गहू परत केल्याने आंतरराष्ट्रीय मागणीवर परिणाम होऊ शकतो. यामुळे देशात आणि परदेशात गव्हाच्या किमती खाली येऊ शकतात.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com