भारतीय गहू निर्यातीवर युएईकडून बंदी

भारताच्या मागणीवरून निर्णय घेतल्याचा जाणकारांचा दावा
भारतीय गहू निर्यातीवर युएईकडून बंदी
Wheat ExportAgrowon

पुणेः यंदा संयुक्त अरब अमिराती अर्थात युएईचा मुख्य गहू पुरवठादार (Wheat Supplier) म्हणून भारत पुढे आला. मात्र भारतातून आयात केलेला गहू (Wheat Import) किंवा त्यापासून तयार केलेले पीठ निर्यात (Wheat Flour Export) करू नये, अशी भारताने मागणी केली होती. त्यानुसार युएने पुढील चार महिन्यांसाठी भारतातून आयात केलेला गहू आणि त्यापासून तयार केलेले पीठ निर्यातीवर बंदी (Wheat Export Ban) घतली.

अमेरिका कृषी विभाग म्हणजेच युएसडीएच्या मते युएई गव्हाची संपूर्ण गरज आयातीतून भागविते. युएई दरवर्षी १५ लाख टन गहू आयात करते. परंतु येथील मिलींग प्रक्रिया क्षमता जवळपास १७ लाख टनांची आहे. युएईमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक गव्हाची आयात रशिया त्यानंतर कॅनडा, युक्रेन आणि ऑस्ट्रेलियातून होते. मात्र २०२०-२१ पासून भारताकडूनही आयात वाढली. परंतु चालू हंगामात रशिया-युक्रेन युध्दामुळे समिकरण बदलले आणि भारत मुख्य पुरवठादार ठरत आहे.

गहू टंचाईमुळे जागतिक बाजारात दरदिवशी काहीतरी घडामोडी घडत आहेत. भारताच्या भुमिकेचा आंतरराष्ट्रीय बाजारावर लगेच परिणाम जाणवत आहे. यंदा भारत संयुक्त अरब अमिरातीला अर्थात युएईला गहू आणि पिठाची निर्यात करणार देश ठरला. भारताने युएईला २०२१-२२ मध्ये ७२ लाख ३५ हजार टन धान्य निर्यात केली. त्याचे मुल्य २१.२ कोटी डाॅलर होते. यात ६.४ टक्के गहू होता. या वर्षात युएईला ४ लाख ७१ हजार टन गहू निर्यात केली. त्याचे मुल्य १३.६ लाख डाॅलर होते.

पुढील काळातही गहू टंचाई कायम राहू शकते. त्यामुळे भारताने देशातील अन्नसुरक्षेसाठी गहू निर्यातबंदी केली. परंतु सरकारी पातळीवर गहू आयात करून युएईमधून पुन्हा निर्यात होऊ शकते. कारण येथील गहू प्रक्रिया क्षमता अधिक आहे. त्यामुळे गव्हावर प्रक्रिया करून स्थानिक वापर आणि निर्यात केली जाते. येथून सौदी अरेबिया, बेहरीन, जाॅर्डन, इथोपिया, तैवान आणि फिलिपिन्स या देशांना जवळपास १ लाख टन गहू पिठाची निर्यात होते. त्यामुळे युएईनेही भारतातून आयात केलेल्या गव्हाची किंवा त्यापासून निर्मिती पिठाची निर्यात करू नये, अशी मागणी भारताने केली होती. भारताने सांगितले. त्यामुळे युएईने हा निर्णय घेतल्याचे जाणकारांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com